( प्रगत भारत । pragatbharat.com)
Zombie Virus : कोरोनाच्या महामारीनंतर हळूहळू जग पुन्हा एकदा स्थिरावत आहे. अशातच आता 48,500 वर्ष जुन्या व्हायरसमुळे संपूर्ण जग टेन्शनमध्ये आले आहे. हा व्हायरस भारतासह अनेक देशांसाठी धोकादायक ठरू शकतो. आर्क्टिकतील बर्फाखाली दबला गेलेला झोम्बी व्हायरस पुन्हा जिवंत झाल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
मागील काही वर्षांत जगभरात तापमान झपाट्याने वाढत आहे. जागतिक तापमानवाढीमुळे बर्फ वितळत असल्याने विषाणू बाहेर येण्याची भिती व्यक्त केली जात आहे. काही वर्षांपूर्वी शास्त्रज्ञांनी या व्हायरसचे नमुने घेतले होते. आर्क्टिक बर्फात असलेले विषाणू अनेक हजार वर्षांपासून बर्फाखाली दबून राहिल्याचे संशोधनातून समोर आले आहे.
Aix-Marseille University चे शास्त्रज्ञ जीन मिशेल यांनी या झोम्बी व्हायरसबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. झोम्बी व्हायरस संदर्भातील एक अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. या अहवालात हा व्हायरस पसरला तर काय स्थिती निर्माण होवू शकते याची भिती देखील व्यक्त करण्यात आली आहे. सायबेरियन भागातून अनेक प्रकारचे विषाणूचे नमुने घेण्यात आले होते. ज्यामध्ये एक विषाणू सुमारे 48,500 वर्षे जुना असल्याचे समोर आले आहे.
झायलाजीन नावाच्या औषधामुळे झोम्बी व्हायरस पसरतोय अमेरिकेत रस्त्यावर लोक चित्र विचित्र हावभाव करताना दिसतायेत. या लोकांकडे पाहिल्यानंतर हजारो वर्षांपूर्वीचा झोम्बी व्हायरस पुन्हा जिवंत झाल्याचा दावा केला जातोय.. ही झोम्बीची दहशत पसरण्यामागचं कारण आहे एक औषध. झायलाजीन नावाच्या औषधांमुळेच लोकांमध्ये झोम्बी व्हायरस वेगानं पसरत असल्याचं सांगितलं जातंय. याचे फोटो सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतायेत.
झायलाजीन (Xylazine) औषध प्राण्यांसाठी बनवण्यात आलं असून त्याचा वापर प्राण्यांना बेशुद्ध करण्यासाठी केला जातो. मात्र हेच औषध माणसांनी घेतलं तर ती झोम्बीसारखं वागू लागतात. सुरूवातीला या औषधांचा वापर फिलाडेल्फियात झाला. त्यानंतर सॅन फ्रान्सिस्को, लॉस एंजिलिस आणि इतर मोठ्या भागातही झायलाजीनचा साठा पोहचलाय. या औषधांमुळे अनेकांची त्वचा सडू लागलीय. या औषधाचे परिणाम इतके घातक आहेत की, बाधित व्यक्तीचा एखादा अवयवही कापून टाकावा लागू शकतो.
अलिकडेच रशियन शास्त्रज्ञांनी तब्बल 48 हजार वर्षं बर्फाखाली दाबल्या गेलेल्या एका व्हायरसला जिवंत केल्याचा दावा फ्रान्सच्या शास्त्रज्ञांनी केला होता. या व्हायरसचं वैज्ञानिक नाव पंडोराव्हायरस एडिमा असं आहे. या बातमीनंतर आता अमेरिकेत झोम्बीचे रूग्ण आढळून आलेत. त्यामुळे पुन्हा एकदा सा-या जगाचं टेन्शन वाढलंय.