Ajit Pawar Maharashtra Political Crisis LIVE maharashtra politics Opposition leader Ajit pawar to step down likely to take oath as deputy chief minister Crisis in NCP

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ajit Pawar Maharashtra Political Crisis LIVE : महाराष्ट्राच्या राजकारण (Maharashtra Politics) अभूतपूर्व परिस्थिती ओढावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप होण्याची शक्यता आहे. अजित पवार (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. अजित पवार राजभवनात दाखल झाले आहेत. अजित पवारांनी शरद पवारांनी मान्य न केल्यामुळे शरद पवार (Sharad Pawar) नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार विरोधी पक्षनेताचा राजीनामा देणार असल्याची माहिती समोर येत आहे. राजभवनाकडे शासकीय गाडी न वापरता खासगी वाहनाचा वापर केला आहे.

अजित पवार यांच्याकडून हालचाली सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सोबत भाजपचे मंत्री राजभवनात दाखल झाले आहेत. त्यामुळे एकंदरीत आता अजित पवार हे स्वतंत्र गट घेऊन भाजपमध्ये सामील होणार की अन्य कोणती राजकीय घडामोड घडणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार अनेक विषयांमुळे चर्चेत आहेत. त्याचबरोबर काही वेळापूर्वीच शरद पवार यांनी शक्यता खोडून काढली होती. मात्र, आता थेट अजित पवार राजभवनाच्या दिशेने गेल्याने आजच राजकारणामध्ये मोठीच एखादी घडामोडी जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार 28 आमदारांसह अजित पवार हे भाजपमध्ये सामील होणार असल्याचे म्हटले जात आहे. 

[ad_2]

Related posts