Rajasthan Bhilwara Women Beaten Up In Laws Hair Chopped Called Witch

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rajasthan News : सासरच्या मंडळींकडून सुनेला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या मंडळींनी सूनेला बेदम मारहाण करत गरम सळ्यांचे चटके दिले, इतकंच नाहीतर तिला जमिनीत पुरण्यासाठी जेसीबीही मागवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुनेला चेटकीण म्हणत सासरच्या मंडळीनी छळ केल्याचं समोर आलं आहे. राजस्थानमधील ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे.

सासरच्या मंडळींकडून सुनेला छळ

राजस्थानमधील भिलवाडा येथील ही हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सुनेला चेटकीण म्हणत सासरच्यांनी निर्दयीपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. सासरच्यांनी महिलेच्या शरीरावर गरम सळ्यांने चटके दिले, तिचे दात तोडले आणि केसही कापले. यानंतर त्यांनी सूनेला गाडण्यासाठी जेसीबीही मागवला होता. पीडितेच्या वडिलांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 30 जून रोजी ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

काय आहे प्रकरण?

पीडितेच्या वडीलांनी मुलीच्या सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली आहे. पीडितेच्यास वडीलांनी दिलेल्या माहितीनुसार, 2021 मध्ये त्यांनी अजमेर जिल्ह्यातील एका गावात ऐपतीप्रमाणे मुलीचं लग्न लावून दिलं. लग्नानंतर काही दिवसांनी सासरच्या मंडळींकडून मुलीचा छळ सुरु झाला. महिलेला मारहाण करत सासरच्या मंडळींकजून हुंड्याची मागणी करण्यात आली. त्यांनी चेटकीण म्हणत सुनेचा छळ सुरु केला. सासरची मंडळी सूनेला माहेर पाठवत नव्हते आणि तिला बेदम मारहाण करायचे. लग्नानंतर एका वर्षाने महिलेने एका मुलाला जन्म दिला. पण, त्यानंतरही सूनेचा छळ सुरुच राहिला.

पीडितेच्या वडीलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी मुलीच्या लग्नावेळी ऐपतीप्रमाण हुंडा दिला होता. त्यांनी लग्नात मुलीला कूलर, टिव्हीपासून ते सोने-चांदीच्या दागिन्यांपर्यंत सर्व वस्तू दिल्या होत्या. पण त्यानंतरही सासरच्या मंडळींची हाव वाढत राहिली आणि त्यांनी महिलेचा छळ सुरु ठेवला. महिलेला मारहाण केली जात असे. सासरची मंडळी तिला चेटकीण म्हणत तिला गरम सळ्यांचे चटकेही देत असतं.

[ad_2]

Related posts