Rebel ncp mla amol kolhe returns to sharad pawar

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांना पहिला धक्का बसला आहे. कारण शपथविधीला हजर असणारे शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी आपण शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत असल्याचं जाहीर केलं आहे.

अमोल कोल्हे यांनी ट्वीट करुन आपली भूमिका जाहीर केली आहे. “जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है … पर दिल कभी नहीं। #मी_साहेबांसोबत” असं अमोल कोल्हे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला खासदार अमोल कोल्हे आणि खासदार सुनिल तटकरे काल (2 जुलै) राजभवनात उपस्थित होते. त्यामुळे अमोल कोल्हे अजित पवारांच्या पाठिशी असल्याचं म्हटलं जात होतं. तर शरद पवार यांना हा मोठा धक्का समजला जात होता. मात्र आज अमोल कोल्हे यांनी मी साहेबांसोबत असल्याचं ट्वीट केलं आहे.


हेही वाचा

[ad_2]

Related posts