Team India Arrived In West Indies But Why Not Started Cricket Practice ; वेस्ट इंडिजमध्ये पोहोचल्यावर भारताने क्रिकेट नाही तर कोणता खेळ सुरु केला

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बार्बाडोस : भारतीय संघाचे आता वेस्ट इंडिजमध्ये आगमन झाले आहे. भारतासाठी हा दौरा महत्वाचा असेल. या दौऱ्यावर पोहोचल्यावर भारतीय संघ क्रिकेटचा सराव करेल, असे चाहत्यांना वाटत होते. पण भारतीय संघाने आता क्रिकेट सोडून दुसराच खेळ खेळायला सुरुवात केली आहे. या गोष्टीचा व्हिडिओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाला आहे.भारताला विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर भारतीय संघावर जोरदार टीका करण्यात आली होती. कारण भारताचा या सामन्यात मानहानीकारक पराभव झाला होता. त्यामुळे आता वेस्ट इंडिजच्या मालिकेत भारतीय संघ चांगली कामगिरी करेल, असा विश्वास भारताच्या चाहत्यांना होता. पण भारताचे खेळाडू वेस्ट इंडिजमध्ये दाखल झाले आणि त्यांनी क्रिकेटचा सराव करायचेच सोडून दिले. यावेळी क्रिकेटचा सराव न करता त्यांनी दुसऱ्याच खेळाला प्रधान्य दिले. बीसीसीआयने या गोष्टीचा व्हिडिओ आपल्या सोशल मीड्यावर पोस्ट केला आहे आणि तो सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाला आहे.

या दौऱ्यासाठी भारतीय संघात एका खास व्यक्तीची निवड करण्यात आली होती. १२ जुलै रोजी भारत या दौऱ्याची सुरुवात (IND vs WI) कसोटी मालिकेने करेल. मात्र हा दौरा सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने एका अनुभवी व्यक्तीचा संघात समावेश केला आहे. विशेष म्हणजे भारतीय निवड समितीने संघात समाविष्ट केलेल्या अनुभवी व्यक्तीची ही घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI चे माजी सचिव आणि केरळ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयेश जॉर्ज यांना वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचे व्यवस्थापक बनवण्यात आले आहे. सौरव गांगुलीच्या बीसीसीआय अध्यक्षपदाच्या कार्यकाळात जॉर्ज हे बोर्डाचे सहसचिवही राहिले आहेत. त्यामुळे आता जॉर्ज यांच्या रुपात भारतीय संघाला एक मोठी व्यक्ती लाभली आहे आणि त्यांच्या या अनुभवाचा फायदा भारतीय संघाला होईल, असे म्हटले जात आहे.

धोनीला वाढदिवसानिमित्त आंध्र प्रदेशच्या चाहत्यांचे खास गिफ्ट; उभारला 41 फुटांचा कटआऊट

वेस्ट इंडिजमध्ये पोहोचल्यावर भारतीय संघ क्रिकेटचा सराव करेल, असे वाटत होते. पण भारतीय संघाने मात्र तसे केलेले नाही.

[ad_2]

Related posts