MCC Apologies to Australia Cricket Team & Suspends 3 Members Who Clashes With Usman khwaja and David Warner In Lords Long Room; ऑस्ट्रेलियन संघासोबत गैरवर्तन प्रकरणी मोठी कारवाई, ३ जण निलंबित तर MCCनेही माफी मागितली

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लंडन: अ‍ॅशेस २०२३चा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मालिकेतील दुसऱ्या कसोटीच्या ५व्या दिवशी जॉनी बेअरस्टोला बाद करण्याबाबत मोठा वाद झाला. बेअरस्टो वादग्रस्तपणे धावबाद झाला, त्यानंतर स्टेडियममधील घरच्या प्रेक्षकांनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर चुकीचे खेळल्याचा आरोप केला. संघातील खेळाडू लंच ब्रेकसाठी पॅव्हेलियनच्या दिशेने जात असतानाही प्रेक्षक ‘चीटर्स, चीटर्स’चा नारा देत होते. डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा या ऑस्ट्रेलियन खेळाडूंसोबत एमसीसी सदस्यांनी ड्रेसिंग रूममध्ये जाताना ‘लाँग रूम’मध्ये हाणामारी केली. यावर कडक कारवाई करत एमसीसीने ३ सदस्यांना निलंबित केले आहे.

मेरीलेबोन क्रिकेट क्लबने (MCC) नंतर काही सदस्यांनी ‘लाँग रूम’मध्ये केलेल्या गैरवर्तनाबद्दल ऑस्ट्रेलियन संघाची माफी मागितली. तसेच, जे ऑस्ट्रेलियन खेळाडूंना शिवीगाळ आणि हाणामारी करत होते त्यांची चौकशी केली जाईल, असे एमसीसीकडून सांगण्यात आले आहे. एवढेच नाही तर एमसीसीने ३ सदस्यांना निलंबितही केले आहे.

मात्र, आता एमसीसीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी ३ सदस्यांना निलंबित केले आहे. एमसीसीने म्हटले की, ऑस्ट्रेलियन संघासोबत जे काही झाले ते असह्य आहे आणि ते त्याचा तीव्र निषेध करते. सभासदांच्या या वृत्तीमुळे क्लबच्या प्रतिष्ठेला धक्का बसणार आहे. याबद्दल त्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाची मनापासून माफी मागितली आहे.

ख्वाजा आणि कमिन्सने संताप व्यक्त केल्यानंतर कारवाई

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर उस्मान ख्वाजा आणि क्लबचे सदस्य यांच्यात हाणामारी होत असताना प्रकरण आणखी चिघळले. मात्र, सुरक्षा रक्षकाने मध्यस्थी केल्यानंतर ते आटोक्यात आले. ख्वाजा आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स यांनी या घटनेवर आक्षेप घेतला. ऑस्ट्रेलियन संघाला दिलेल्या वागणुकीबद्दल त्यांनी एमसीसीसमोर संताप व्यक्त केला, त्यानंतर मेरीलेबोन क्रिकेट क्लबने (MCC) याप्रकरणी माफी मागितली आणि कारवाईचा विश्वास व्यक्त केला.
तर झालं असं की बेअरस्टोने कॅमेरून ग्रीनचा बाउन्सर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊ दिला. यानंतर चेंडू ‘डेड’ होण्यापूर्वीच तो क्रीज सोडून दुसऱ्या टोकाला उभ्या असलेल्या आपल्या जोडीदाराकडे गेला, त्याचवेळी यष्टिरक्षक अॅलेक्स कॅरीने चेंडू स्टंपवर आदळला. ऑस्ट्रेलियन संघ या विकेटवर सेलिब्रेशन करत होते. त्याच वेळी, इंग्लंड संघ आश्चर्यचकित होता. अशाप्रकारे बेअरस्टोची विकेट पडल्यानंतर सहसा सभ्य वर्तनासाठी ओळखले जाणारे लॉर्ड्सचे प्रेक्षकही संतापले. ते ऑस्ट्रेलिया चिटर्स, धोखेबाज अशा घोषणा देऊ लागले.

[ad_2]

Related posts