Pune PMPML News Number Of PMPML Passengers Reduced Average Of Eight Lakh Passengers Per Day

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune PMPML :  शहरातील खासगी वाहनांची संख्या (Pune PMPML)  30 लाखांवर गेली आहे. त्यामुळे मात्र गेल्या वर्षभरात पीएमपीएमएलच्या प्रवाशांची संख्या जवळपास दोन लाखांनी घटली आहे. शहरातील रस्ते खासगी वाहनांच्या वाहतुकीसाठी अपुरे पडत असल्याने पीएमपीएमएलची सेवा अधिक सक्षम करून सार्वजनिक वाहतुकीची संख्या वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

पीएमपीएमएल प्रशासनाने एप्रिल 2022 ते मार्च 2023 या वर्षातील प्रवाशांची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार दररोज सरासरी 8 लाख 738 प्रवाशांनी पीएमपीएमएलने प्रवास केल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत पीएमपीएमएलने दरवर्षी सरासरी 10 ते 11 लाख प्रवासी प्रवास करत होते. या आकडेवारीवरुन पुणेकर सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

पीएमपीएमएलने जारी केलेली आकडेवारीवर पाहिल्यास, प्रवाशांमध्ये प्रामुख्याने महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच इयत्ता 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शैक्षणिक वर्ष जून ते ऑगस्ट सुरू होऊन मार्च ते एप्रिलमध्ये संपते. या महिन्यांत पीएमपीएमएलच्या प्रवाशांची संख्या आठ लाखांच्या पुढे गेली आहे तर उर्वरित कालावधीत प्रवाशांची संख्या सात ते आठ लाखांच्या दरम्यान आहे. दिवाळीच्या काळातही पीएमपीएमएल प्रवाशांची संख्या अधिक असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

PMPML ची ‘पिंपरी-चिंचवड दर्शन’

पुणे PMPMLकडून प्रवाशांसाठी कायम नवनवे उपक्रम राबवण्यात येत असतात. प्रवाशांना सुखसुविधा मिळाव्यात आणि त्यांचा प्रवास उत्तम होण्यासाठी PMPML प्रशासन कायम तत्पर असतं. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु झाल्या आहेत. त्यामुळे अनेक नागरिक पर्यटनासाठी प्लॅन आखत आहे. त्यांच्यासाठी PMPML ने पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकरांसाठी खास सुविधा सुरु केली आहे. पिंपरी-चिंचवड  शहरातील ऐतिहासिक, प्रेक्षणीय आणि धार्मिक स्थळांची सफर नागरिक, पर्यटकांना घडवण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून ‘पिंपरी-चिंचवड दर्शन’ ही बससेवा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे

पिंपरी-चिंचवड शहरातील ऐतिहासिक, प्रेक्षणीय आणि धार्मिक स्थळांची सफर ही बससेवा 2019 मध्येच सुरु करण्यात आली होती. मात्र या बसला नागरिकांचा फार प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ही बससेवा काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती. मात्र मागील काही दिवसांपासून PMPML ने सुरु केलेले उपक्रम यशस्वी होत असताना पाहून त्यांनी ही बससेवा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘पिंपरी-चिंचवड दर्शन’ बससेवेमध्ये प्रतिप्रवासी 500 रुपये  तिकीट दर आकारणी करण्यात येणार आहे. ‘पिंपरी-चिंचवड दर्शन’ बसेसचे तिकीट वितरण निगडी, भोसरी आणि पिंपरी लोखंडे भवन येथील पास केंद्रावर उपलब्ध असणार आहेत.

 

[ad_2]

Related posts