Truck hits vehicles after brake failure on mumbai-agra highway in dhule

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

धुळे – मुंबई – आग्रा महामार्गावर (Dhule-Mumbai-Agra Highway) पळासनेर (Palasner) गावाजवळ भीषण अपघात (Accident) झाला आहे. ब्रेक फेल होऊन कंटेनर एका हॉटेलमध्ये शिरल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात 12 जणांचा चिरडून जागीच मृत्यू झाला आहे.

तर या भीषण अपघातात पंधरा ते वीसजण जखमी झाले आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पळासनेर हे गाव मध्य प्रदेशच्या सीमेवर येतं. याच गावाजवळ साधारणतः दुपारी 12 वाजताच्या दरम्यान ही अपघाताची घटना घडली. एक कंटेनर महामार्गावरुन जात असताना त्याचा ब्रेक फेल झाला आणि तो थेट हॉटेलमध्ये शिरला.

या भीषण अपघातात 12 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 15 ते 20 जण जखमी झाले आहेत. सध्या अपघातस्थळी मदतकार्य सुरू आहे. जखमींना तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 

[ad_2]

Related posts