5 Drinks In Diet To Fulfill Calcium In 206 Bones Instead Of Milk; २०६ हाडांमध्ये भरायचे असेल कॅल्शियम तर फक्त दूध हाच पर्याय नाही, निवडा हे ५ ड्रिंक्स

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अंजीर शेक

अंजीर शेक

Fig Shake: USDA नुसार, प्रत्येक १०० ग्रॅम सुकलेल्या अंजीरमध्ये तुम्हाला १६२ मिलीग्रॅम कॅल्शियम मिळते. याशिवाय अंजीरामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अनेक खनिजे असतात. नुसतं दूध न पिता, तुम्ही दुधात २-३ सुकलेले अंजीर मिक्स करा आणि त्याची स्मूदी वा शेक बनवा आणि प्या. यामध्ये तुम्ही काही हंगामी फळांचाही समावेश करू शकता. अंजीरमधून शरीराला अधिक कॅल्शियम मिळते.

बदाम आणि पालक स्मूदी

बदाम आणि पालक स्मूदी

Almond And Spinach Smoothie: बदामामध्ये कॅल्शियमचा सर्वात चांगला नैसर्गिक स्रोत सापडतो, याबाबत तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला पौष्टिक आहारातून जर कॅल्शियम मिळवायचे असेल तर बदाम आणि पालकाची स्मूदी हे योग्य ड्रिंक आहे. दोन्ही सुपरफूड्स असून पौष्टिक आणि पोषक तत्वांनी युक्त आहेत. त्यामुळे तुमच्या आहारात या ड्रिंकचा समावेश करून घ्या.

(वाचा – Constipation समस्या होण्यामागे आहेत ५ कारणं, वेळीच घ्या जाणून आणि करा उपाय)

ऑरेंज बूस्ट

ऑरेंज बूस्ट

Orange Boost: ऑरेंज बूस्ट अत्यंत स्वादिष्ट असून संत्र्याचा रस हा लहान मुलांपासून सर्वांनाच आवडतो. गाजर, संत्री, खजूर आणि चिया सीड्सचे मिश्रण एकत्र करून हे ड्रिंक बनविण्यात येते. यामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असून अनेक आवश्यक पोषक तत्व मिळतात. Power Drink असणारे हे ड्रिंक शरीरातील हाडांना कॅल्शियम मिळवून देते.

(वाचा – Weight Loss Breakfast: त्वरीत वजन कमी करण्यासाठी खा असे सुपरफूड्स, गायब होईल पोटावरील लटकलेली चरबी)

अननस – केल स्मूदी

अननस - केल स्मूदी

केल, कोलार्ड ग्रीन्स, ब्रोकोली हे सर्व सुपरफूड्स असून अनेक आरोग्यदायी फायदे यातून मिळथात. केलमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असून अननसामध्ये मिनरल्स अधिक असतात, जे हाडांना, दातांना आणि वजन कमी करण्यसाठी अधिक चमत्कारी ठरते. अननस आणि केल स्मूदी कॅल्शियमचा अधिक स्रोत मिळतो.

(वाचा – रिकाम्या पोटी केळं खाण्याचे ७ फायदे, वजन कमी करण्यापासून शुगरवर नियंत्रण ठेवेपर्यंत जबरदस्त लाभ)

Vegan हळद दूध

Vegan हळद दूध

Vegan लोकांसाठी हळदीचे दूध हा चांगला पर्याय आहे. हळदीच्या दुधाचे अत्यंत उपयुक्त ठरते. यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट आणि सूज विरोधी अनेक गुण आढळतात. अतिरिक्त कॅल्शियम वाढविण्यासाठी तुम्ही बदामाचे दूध अथवा हळदीचे दूध पिऊ शकता.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा

[ad_2]

Related posts