Meta Will Launch Threads App On 6th July This App Are Rival To Twitter This App Available On Appstore Tech News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Threads App: गेल्या काही महिन्यापासून ट्विटरच्या नवीन पॉलिसीमुळे युजर्स त्रस्त आहेत.यामुळे अनेक युजर्स ट्विटरला सोडत आहेत. ही इतर टेक कंपन्यांसाठी चालून आलेली चांगली संधी आहे. यावर जानेवारी महिन्यापासून मेटाकडून (Meta) ट्विटरला टक्कर देण्यासाठी मायक्रोब्लॉगिंग अॅपवर काम  केलं जात होतं. आता या अॅपचं कामही पूर्णही झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेटाचं हे नवीन मायक्रोब्लॉगिंग अॅप 6 जुलै रोजी लाँच केलं  जाऊ शकतं. हे नवीन अॅप ट्विटरसारखचं काम करणार आहे. हे नवीन अॅप थ्रेड्स अॅप (Threads App) म्हणून ओळखलं जाणार आहे. यामध्ये युजर्सना  ट्विट, रि-ट्विट, लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करण्याचीही सुविधा मिळणार आहे.  या अॅपच्या व्हेरिफिकेशनसाठी पैसै आकारले जातील का? याबद्दल अधिक माहिती  मिळू शकली नाही.  युजर्स हे अॅप स्टोअरवरून Threads App  डाऊनलोड करू शकतात.  यापूर्वीचं मेटाकडून ट्विटरसारखं इन्स्टाग्राम, फेसबुक या प्लॅटफॉर्मसाठी पेड व्हेरिफिकेशन सर्व्हिस लाँच केली आहे. ही पेड सर्व्हिस भारतातही लागू केली जाऊ शकते. यासोबत कंपनी या नवीन अॅपमध्ये  काही भन्नाट फिचर्सही उपलब्ध करून देऊ शकते. अर्थात, यासाठी युजर्सना अजून काही दिवस वाट पाहावी लागेल.लॉगिन करण्यासाठी इन्स्टाग्राम अकाऊंटच होईल उपयोग

नवीन मायक्रोब्लॉगिग Threads App इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लॉगिन करता येणार आहे.  यामुळे तुम्हाल नवीन अकाऊंट ओपन करायची आवश्यकता नाही.  यासोबत इन्स्टा आणि थ्रेड्सच्या प्लॅटफॉर्मवरील युजर्सनाही फॉलो करण्याचा पर्याय मिळणार आहे. यामुळे तुम्हाला आपल्या इन्स्टाग्रामवरील मित्र-मैत्रिणींशी सहज जोडता येईल. या प्लॅटफॉर्मवर वर्तमानातील आणि उद्या ट्रेंड होणाऱ्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्याची सुविधा मिळणार आहे.

आता ट्विटरच्या स्पर्धक संख्येत झाली वाढ

इलॉन मस्कच्या ट्विटरला फक्त मेटाकडूनच  नव्हे, तर ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांच्या Bluesky च्या माध्यमातून आव्हान उभं केलं आहे.  नुकतंच मस्क यांनी ट्विटरच्या नवीन नियमावली आणली आहे. यानंतर  अनेक युजर्स ट्विटरला सोडून  Bluesky या प्लॅटफॉर्मवर शिफ्ट होत आहेत. यामुळे Bluesky च्या युजर्स ट्रॅफिक इतकी वाढ झाली की त्यांची सेवा ठप्प झाली होती.  यानंतर कंपनीनं एक ट्विट करताना सांगितलं की,  Bluesky अॅपमध्ये युजर्स ट्रफिक वाढलं आहे. यामुळे अॅपची सेवा डाऊन असून जी लवकरचं नीट दूरूस्त केली जाईल. यावरून येत्या काळाता ट्विटरला Threads App आणि Bluesky  या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडून जबरदस्त स्पर्धा  करावी लागणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या वाचा :  

Twitter कडून TweetDeck चं नवं वर्जन लॉन्च; पण वापर करण्यासाठी ब्लू टिक अनिवार्य

[ad_2]

Related posts