6G Network Service Will Start India Till 2030 By Central Minister Ashwini Vaishnav And Benefits Of 6G Network

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

6G Network: भारतात अजून 5G च्या टेक्नॉलॉजीचे जाळे पसरलेलं नाही. आता अशातच 6G Network  बाबतची घोषणा करण्यात आली आहे. देशात दूरसंचार आणि 6G Network च्या सेवांचा विकास करण्यासाठी ‘भारत 6G अलायन्स’ (Bharat 6G Alliance) या संस्थेची स्थापना करण्याची घोषण करण्यात आली आहे.  दिल्लीमधील एका कार्यक्रमात केंद्रीय दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी घोषणा केली. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी म्हटलंय की, ‘भारत 6G अलायन्स’ (B6GA) या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून देशात 6G Network च्या टेस्टिंगला सुरूवात केली जाईल. ही संस्था देशांतर्गत उद्योग, शैक्षणिक संस्था, राष्ट्रीय संशोधन संस्था आणि सरकारी संस्थांचं एक संघटन म्हणून काम करेल. याद्वारे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना सरकार मदत करणार आहे. भारतात 2030 पर्यंत 6G Network सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यामुळे विज्ञान, आरोग्य, शिक्षण, बाजारपेठा व उत्पादन क्षेत्रांमध्ये अमुलाग्र बदल होणार आहे. 

प्रत्येक जनरेशनसोबत नेटवर्कच्या सेवांमध्येही होतो बदल

दूरसंचार टेक्नॉलॉजीमध्ये प्रत्येक जनरेशनसोबत नेटवर्क सेवांमध्ये बदल होतो. नोकियाच्या अधिकृत वेबसाईटनुसार, 2G आणि 3G च्या काळात व्हाईस आणि टेक्स्टचा संवादासाठी उपयोग केला जात होता. यामध्ये एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंतच्या संवाद पोहोचायला हवा, यावर लक्ष देण्यात आलं होतं.  4G सेवेच्या काळात डेटाचं महत्त्व वाढलं. डेटाचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला. यामुळे त्याच्या वापरात मूलभूत बदल व्हायला सुरूवात झाली. तर 5G च्या सेवेचं मुख्य लक्ष इंटरनेट ऑफ थिंग्स (IOT) आणि इंडस्ट्रियल ऑटोमेशन सिस्टीमला जोडण्यावर होतं. 

कशी असेल 6G टेक्नॉलॉजी 

6G च्या टेक्नॉलॉजीमुळे अनेक क्षेत्रांत बदल होणार आहेत. येत्या काळात 6G टेक्नॉलॉजी अत्यंत वेगवानं सेवा असेल.  5G Network  सेवेचं नवीन व्हर्जन म्हणून  6G टेक्नॉलॉजीकडे पाहिलं जातंय. यामुळे नेटवर्कच्या सेवांमध्ये अनेक बदल होतील. 6G टेक्नॉलॉजीमुळे विज्ञान, आरोग्य, शिक्षण, बाजारपेठा व उत्पादन क्षेत्रांमध्ये अमुलाग्र बदल दिसून येईल.

कोणतं नेटवर्क कधी करण्यात आलं लाँच

2G नेटवर्क- वर्ष 1992
3G नेटवर्क- वर्ष 2001
4G नेटवर्क- वर्ष 2009
5G नेटवर्क- वर्ष 2019 आणि 2030 पर्यंत देशात 6G नेटवर्कची सेवा उपलब्ध होऊ शकते. 

6G नेटवर्क आणि फायदे 

नोकियाच्या अधिकृत वेबसाईटनुसार,  5G नेटवर्क सेवा 6G नेटवर्कमध्ये शिफ्ट केल्यानंतर आणखीन चांगली सेवा मिळेल. फोर्ब्सच्या एका रिपोर्टनुसार, 6G नेटवर्क सेवा 5G पेक्षा 100 पटींनी वेगवान असेल. यामुळे बँडविड्थ क्षमतेत वाढ होईल आणि कामात नाविन्य दिसून येईल. यासोबत बँडविड्थ क्षमता वाढल्यामुळे वेगवान नेटवर्क सेवा उपलब्ध होईल. नोकियाच्या अधिकृत वेबसाईटनुसार, 6G नेटवर्क सेवांच्या काळातही स्मार्टफोनचं महत्व आबाधित राहिल. यामुळे माहितीचं आदान-प्रदान करणं आणि माहिती नियंत्रित करणं अधिक सोईस्कर होईल. संवादासाठी टचस्क्रीन टायपिंग ऐवजी जेश्चर आणि व्हॉइस कंट्रोलमध्ये बदलली जाईल. जेश्चर संवाद प्रणालीत तुमचा हात, चेहरा किंवा शरीराच्या इतर भागांच्या हालचाली केल्या जातात. यामध्ये कोणताही शाब्दिक संवाद केला जात नाही. यासोबत बरीच उपकरणं कपड्यांच्या आत बसवता येतील आणि त्वचेच्या पॅचमध्ये देखील बदलवता येतील.

इतर महत्त्वाच्या बातम्या वाचा :

6G Technology : भारतात लवकरच 6G सेवा सुरु करणार! पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा



[ad_2]

Related posts