[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
दीड वर्षांच्या मुलाची हत्या २७ जून २०२३ मध्ये झाली होती. सूरतच्या डिंडोली परिसरात एका निर्माणाधीन इमारतीत मजुरी करणारी नयन मंडावी तिचा दीड वर्षीय मुलगा वीर मंडावी बेपत्ता असल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली. पोलिसांनी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवून अपहरणाची नोंद केली. त्यानंतर वीरचा तपास सुरू केला.
महिला ज्या निर्माणाधीन इमारतीत मजुरीचं काम करायची, तिथले सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास पोलिसांनी सुरुवात केली. सीसीटीव्हीमध्ये कुठेच चिमुरडा साईट सोडून दूर जाताना दिसत नव्हता. वीर बेपत्ता झाल्यासंदर्भात पोलिसांनी आरोपी आईला अनेक प्रश्न विचारले. मात्र तिला पोलिसांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं देता आली नाहीत.
बेपत्ता मुलाचा शोध घेण्यासाठी श्वानपथकाची मदत घेतली. श्वानपथक बांधकाम साईटपासून दूर गेलाच नाही. दीड वर्षांचा मूल साईटच्या बाहेर जिवंत गेलेला नाही, हे पोलिसांच्या लक्षात आलं. ‘माझा प्रियकर झारखंडमध्ये राहतो. त्यानं मुलाचं अपहरण केलं असावं,’ असा संशय महिलेनं व्यक्त केला. पोलिसांनी महिलेच्या प्रियकराशी संपर्क साधला. त्याचं लोकेशन शोधलं. मात्र त्याचं लोकेशन सूरतच्या आसपास नव्हतं. त्यामुळे महिला खोटं बोलत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.
चिमुकला बांधकाम साईटच्या बाहेर गेलेलाच नाही, त्याचं कोणी अपहरण केलेलंच नाही, मग तो गेला कुठे असा प्रश्न पोलिसांना पडला. तक्रारदार महिलेची पोलिसांनी पुन्हा चौकशी केली. तिला पोलिसी खाक्या दाखवण्यात आला. त्यानंतर महिलेनं गुन्ह्याची कबुली दिली. एका खड्ड्यात मुलाचा मृतदेह गाडल्याचं तिनं सांगितलं. यानंतर पोलिसांनी तिथे जेसीबीनं खोदकाम केलं. पण मृतदेह हाती लागला नाही.
आपण मृतदेह तलावात फेकल्याचं तिनं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी तलावात मृतदेह शोधून पाहिला. पण हाती काहीच लागलं नाही. त्यानंतर पोलिसांनी महिलेची कसून चौकशी केली. तेव्हा महिला खरं बोलली. बांधकामाच्या साईटवर टॉयलेटसाठी तयार करण्यात आलेल्या खड्ड्यात मुलाचा मृतदेह फेकल्याची माहिती तिनं दिली. तिथे मृतदेह सापडला.
महिला मूळची झारखंडची रहिवासी आहे. तिचा प्रियकरदेखील झारखंडचा आहे. मुलाला माझ्याकडे आलीस तर तुचा स्वीकार करणार नाही, असं महिलेच्या प्रियकरानं सांगितलं. त्यामुळे महिलेनं मुलाची हत्या केली. मृतदेह कोणाच्या हाती लागू नये, आपल्याला पोलीस पकडू नयेत, यासाठी तिनं दृश्यम सिनेमा आणि क्राईम पेट्रोलचे अनेक एपिसोड पाहिले. त्यातूनच तिला मृतदेह टॉयलेटच्या खड्ड्यात गाडण्याची कल्पना सुचली.
[ad_2]