[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
२०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. केंद्रात गृहराज्यमंत्रिपदाची महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे जी किशन रेड्डी यांची तेलंगणच्या भाजप प्रदेशाध्यक्षपदी बदली करण्यात आली आहे. डी. पुरंदेश्वरी यांची आंध्र प्रदेशात, माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी यांची झारखंडमध्ये, तर पंजाबचे दिग्गज नेते सुनील जाखड यांची त्या राज्याच्या भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
रेड्डी यांनी अलीकडच्या काळात के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस सरकारच्या विरोधात जोरदार आवाज उठवला आहे. तेलंगणमध्ये काही दिवसांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याआधी रेड्डी यांच्यावर त्यांचा कस पाहणारी जबाबदारी भाजप नेतृत्वाने टाकली आहे. बाबुलाल मरांडी हे झारखंडचे पहिले मुख्यमंत्री आहेत.
२०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी आपला पक्ष भारतीय जनता पक्षात विलीन केला. झारखंडमध्ये लोकसभेच्या १४पैकी एनडीए आघाडीकडे १२ जागा आहेत. काँग्रेसचे दीर्घकाळ प्रदेशाध्यक्षपद सांभाळणारे जाखड यांनी नवज्योत सिद्धू यांच्याबरोबरच्या वादानंतर काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. आंध्र प्रदेशाची सूत्रे दिलेल्या डी. पुरंदेश्वरी या मूळच्या तेलगू देसमच्या वजनदार नेत्या आहेत. तेलगू देसमचे संस्थापक एन. टी. रामाराव यांच्या त्या कन्या आहेत.
[ad_2]