Pune Weather Forecast Rain Intensity Will Increase In 48 Hours In Pune Avoid Ghat Areas Says IMD

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Weather Forecast : पुण्यासह महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची तीव्रता वाढेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) मंगळवारी सांगितले. पुणे शहर परिसरात 30-40 मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर शहराच्या आसपासच्या घाट परिसरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांनी नागरिकांना पुढील 48 तासांसाठी घाट परिसरात प्रवास टाळण्याचा किंवा आवश्यक ती खबरदारी घेऊन प्रवास करण्याचा इशारा दिला आहे.

गेल्या तीन-चार दिवसांपासून पुणे शहरात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. मात्र येत्या 48 तासांत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यासह महाराष्ट्राच्या काही भागातदेखील मुसळधार पाऊस पडणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. 6 आणि 7 जुलै रोजी खंडाळा, लोणावळा, माथेरान, महाबळेश्वर, वाई आणि मुळशी तहसीलमध्ये जोरदार पाऊस होईल. नागरिकांनी सर्व घाट भागात प्रवास टाळावा आणि पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग ओलांडताना खबरदारी घ्यावी. पुणे शहरातही हळूहळू पावसाचा जोर वाढणार आहे. पुढील 24 तासांत पुणे शहरात 35-45 मिमी पाऊस अपेक्षित आहे. हिंजवडी, तळेगाव, बावधन आणि पश्चिम पुण्यातील इतर भागात 50 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. 

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस अजूनही पडला नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आणखी पावसाची गरज आहे. जुलैमध्ये चांगला पाऊस पडेल, असा अंदाज IMD ने वर्तवला आहे आणि त्यामुळे येत्या काही दिवसांत पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे. 

 

Pune Weather Forecast : मराठवाड्यात आणखी पावसाची गरज..

कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील हवामान उपविभागांमध्ये चांगला पाऊस पडला आहे ज्यामुळे राज्यात पावसाचं प्रमाण चांगलं आहे.  मात्र मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये  पुरेसा पाऊस झाला नाही आहे. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, 1 जून ते 4 जुलै दरम्यानच्या पावसाचा अंदाज घेतला तर सध्या राज्यात  38टक्के पावसाची गरज आहे. तर कोकण आणि गोवा आणि मध्य महाराष्ट्र उपविभागांमध्ये पावसाची 13टक्के आणि 38टक्के पावसाची गरज आहे. मराठवाड्यात चारही उपविभागांमध्ये 64 टक्के पावसाची गरज आहे तर विदर्भात आणखी 56 टक्के पावसाची गरज आहे. 

हेही वाचा-



[ad_2]

Related posts