Beed Crime News An Attempt Was Made By The Husband And Mother-in-law To Burn The Married Woman Alive In The Court Premises

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Beed Crime News:  विवाहितांवरील अत्याचारात घट झाल्याचा दावा करण्यात येतो. मात्र, दुसरीकडे अशा घटना वारंवार समोर येतात. अशीच एक घटना समोर आली आहे. कोर्टात दाखल असलेला खटला मागे घेत नसल्याच्या रागातून एका विवाहितेला तिच्या सासरच्या मंडळींनी कोर्टाच्या परिसरात जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. अत्याचाराविरोधात न्यायाची अपेक्षा असलेल्या कोर्टाच्या आवारातच अशी घटना घडल्याने बीडमध्ये (Beed Crime News) खळबळ उडाली आहे. 

सासरचे लोक छळ करत असल्याने त्यांच्याविरुद्ध माहेरी राहून कायदेशीर लढाई विवाहिता लढत होती. मात्र, न्यायाच्या अपेक्षेने कायदेशीर मार्गाने लढणाऱ्या या विवाहितेला कोर्टाच्या परिसरातच अंगावर डिझेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या शिरूर (Shirur) मध्ये उघडकीस आला आहे.. याप्रकरणी सासू-सासरा व नवर्‍याविरोधात शिरूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी झालेल्या विवाहितेला उपचारासाठी नजीकच्या दवाखान्यात नेण्यात आले. 

रूपाली असं या विवाहित महिलेचे नाव आहे. उस्मानाबाद येथील गोपाळ कंदिले यांच्याशी तिचा विवाह झाला होता. मात्र, त्यानंतर रूपालीच्या सासरच्या मंडळीकडून मानसिक आणि शारीरिक शोषण होऊ लागले. त्यानंतर तिने शिरूर पोलिसांमध्ये सासरच्या मंडळींच्या विरुद्ध तक्रार दिली होती. याच प्रकरणी सुनावणीसाठी तिच्या पती सासू-सासरे हे कोर्टात हजर झाले होते. यावेळी कोर्टातील काम संपल्यानंतर रुपालीचा पती सासू आणि सासर्‍यांनी तिला अंगावर डिझेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तिची सुटका केली. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात पती सासू आणि सासवडतात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘लिव्ह-इन’मध्ये सोबत राहण्यास नकार, प्रियकराने प्रेयसीच्या आईला संपवलं

लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणारी प्रेयसी अचानक घरातून निघून गेली. त्यानंतर अनेकदा विनंती करुन देखील ती परत येत नसल्याने प्रियकराने रागाच्या भरात प्रेयसीच्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील करम येथे उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे यावेळी आरोपी तरुणाने प्रेयसीच्या आईच्या प्रियकरालाही मारहाण केली असल्याचे समोर आले आहे. तर या घटनेनंतर आरोपी प्रियकर फरार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे. बाळू मुंडे असे आरोपीचे नाव आहे. 

news reels reels

इतर महत्त्वाच्या बातम्या:

[ad_2]

Related posts