Life Has Been Very Tough So Far, Said Chetan Sharma After Sting Operation ; आता काहीच आशा नाही… स्टिंग ऑपरेशननंतर चेतन शर्माने मौन सोडलं

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : चेतन शर्मा यांच्या स्टिंग ऑपरेशनने क्रिकेट विश्वात एकच हडकंप झाला होता. शर्मा यांच्या या स्टिंग ऑपरेशननंतर भारतीय क्रिकेटची बरीच रहस्य उलगडली होती. पण हे स्टिंग ऑपरेशन झाल्यावर मात्र शर्मा यांचे नाव कुठेच आले नाही किंवा ते कुठेही पाहायला मिळाले नाहीत. या स्टिंगनंतर त्यांची वाईट परिस्थिती आहे आणि ते निराशेच्या गर्तेत अडकले आहेत. पण त्यांनी सध्या एक भावूक पोस्ट केली आहे, त्यावरून त्यांची सध्याची परिस्थिती कशी आहे, हे समजता येऊ शकते. त्यामुळे त्यांची ही पोस्ट सध्याच्या घडीला चांगलीच व्हायरल झाली आहे.
चेतन शर्मा यांची अवस्था सध्याच्या घडीला कशी आहे, जाणून घ्या…

स्टिंगनंतर चेतन शर्मा हे गेले काही दिवस कुठेच नव्हते. सध्याच्या घडीला ते कुठे आहेत. हेदेखील माहिती नाही. पण त्यांच्या एका ट्विटने मात्र खळबळ उडाली आले. या ट्विटमध्ये चेतन शर्मा यांनी म्हटले आहे की, ” आयुष्य आता फार कठीण झाले आहे. कारण जवळच्या आणि प्रिय व्यक्तींकडूनही आता कसली आशा नाही. मला आशा आहे की माता राणी माझ्यावर कृपा करेल.”

चेतन शर्मा यांनी स्टिंग ऑपरेशनमध्ये तीन वादग्रस्त गोष्टींना हात घातला होता…
१. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात विस्तव जात नाही, असे म्हटले जाते. पण खरंतर त्यांच्यामध्ये कोणतेच भांडण नाही. पण या दोघांमध्ये अहंकार जास्त आहे आहे आणि तोच खरा मोठा अडसर आहे.
२. कर्णधाडरपदावरून भारतीय क्रिकेटमध्ये वाद झाला होता. पण या प्रकरणात विराट कोहलीची चुक होती. कारण सौरव गांगुलीने विराटशी संवाद साधला होता. त्यामुळे कोहली जे काही म्हणाला ते चुकीचे होते.
३. भारताचा संघ निवडताना बऱ्याचदा समस्या जाणवते. कारण खेळाडू पूर्णपणे फिट नसतात आणि आपण फिट असल्याचे सांगतात. काहीवेळा तर खेळाडू फिट होण्यासाठी इंजेक्शन घेतात.

मुंबईत सामना जिंकला आणि बंगळुरुत फटाके फुटले; स्वतःसाठी जमलं नाही ते आरसीबीसाठी केलं

स्टिंग ऑपरेशननंतर मात्र आता चेतन शर्मा यांचे पुढे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

[ad_2]

Related posts