Pune Police Crackdown On Habitual Criminals During Operation All Out Over 1800 Checked And 159 Arrested

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Police : पुण्यात मागील काही दिवसांपासून पुण्यात गुन्ह्यांमध्ये (Pune police) चांगलीच वाढ झाली आहे. कोयता गॅंगने धुमाकूळ (Koyta gang) घातला आहे. अनेक परिसरात गाड्यांची तोडफोड करणं (Pune Crime news) आणि अनेक परिसरात दहशत पसरवण्याचं काम सुरु आहे. यांना रोखणं पुणे पोलिसांपुढे मोठं आव्हान आहे. त्यासाठी पुणे पोलिसांनी चांगलीच कंबर कसली आहे. त्यांनी ऑल आऊट ऑपरेशनला सुरुवात केली आहे. यामार्फत अनेक परिसरात चौकशी आणि कारवाई केली जात आहे. 

 

Pune Crime news: 159 गुन्हेगारांना अटक

पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी शहरातील गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या कारवाई वाहनांची तोडफोड आणि नागरिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या या गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांच्यावर तातडीने कारवाई सुरू करण्यात आली आहे. सोमवारी (3 जुलै) मध्यरात्री राबविलेल्या कारवाईत पोलिसांनी शहरातील विविध भागातून एकूण 159 गुन्हेगारांना अटक केली. यासोबतच आयुक्त रितेश कुमार यांनी गुन्हे शाखा आणि सर्व पोलीस ठाण्यांना या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Pune Crime news: कोम्बिंग ऑपरेशन सुरू

या आदेशाचा एक भाग म्हणून गुन्हे शाखा आणि पोलिस ठाण्याच्या पथकांनी बसस्थानक आणि रेल्वे स्थानकांसह 455 हॉटेल्स, लॉज, ढाबे, सार्वजनिक ठिकाणी कसून झडती घेतली. 3 जुलै रोजी रात्री 10 ते 4 जुलै रोजी पहाटे 2 वाजेपर्यंत चाललेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये संशयितांची ओळख पटवणे आणि त्यांना पकडण्याचं धोरण हाती घेतलं होतं. त्यात अनेकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान, 11 जणांना अटक करण्यात आली असून पोलिसांनी शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत एक पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आणि 10 अन्य शस्त्रे जप्त केली आहेत. शिवाजीनगर, भारती विद्यापीठ, खडकी, विश्रांतवाडी, चतुश्रृंगी, चंदननगर, येरवडा, विमानतळ, लोणीकंद, हडपसर, मुंढवा आणि कोंढवा पोलीस ठाण्यांनी या गुन्हेगारांविरुद्ध वॉरंट बजावले आहेत. 

Pune Crime news: 475 व्यक्तींना दंड

तसेच स्थानिक पोलीस ठाण्यांनी 28 चौक्या स्थापन केल्या आणि 3,282 संशयित वाहनचालकांची तपासणी केली. त्यापैकी 475 व्यक्तींना दंड ठोठावण्यात आला, परिणामी 1,22,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याव्यतिरिक्त वाहतूक शाखेने 1,129 वाहनचालकांची तपासणी केली. त्यापैकी 496 वाहनचालकांना एकूण चार लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. गुन्हे शाखेने 13 गुन्हेगारांवरही कारवाई केली.

 

संबंधित बातमी-

[ad_2]

Related posts