Only One Condition Ajit Agarkar Became Chief Selector Of BCCI ; Ajit Agarkar फक्त या एका अटीवरच झाले अध्यक्ष

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : अजित आगरकर यांच्या नावावर अखेर बीसीसीआयने मोहोर उमटवली आणि त्यांना निवड समितीचे अध्यक्षपद दिले. पण निवड समितीचे अध्यक्षपद मिळण्यापूर्वी अजित आगरकर यांनी बीसीसीआयपुढे ही एक अट ठेवली होती. ती अट मान्य केल्यावरच अजित यांनी निवड समितीचे अध्यक्षपद स्विकारले.

आयपीएलमध्ये अजित हे दिल्ली कॅपिटल्सच्या संघात सहाय्यक प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे त्यांचे सर्व काही व्यवस्थित सुरु होते. पण त्यानंतर त्यांना निवड समितीचे अध्यक्षपद मिळू शकते, अशी ऑफर देण्यात आली होती. पण अजित यांनी ही ऑफर थेट स्विकारली नाही. अजित यांनी उलट बीसीसीआयपुढे एक मोठी अट ठेवली आणि ती अट पूर्ण झाल्याशिवाय ते निवड समिती अध्यक्ष होणार नव्हते. बीसीसीआयने अखेर त्यांची ही अट मान्य केली आणि त्यानंतर त्यांना या पदावर नियुक्त केले.

अजित यांची नेमकी काय अट होती, जाणून घ्या…
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित हे आयपीएलमध्ये सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम करत होते. पण जेव्हा त्यांना बीसीसीआयने भारतीय निवड समितीच्या अध्यक्षपदाबाबत विचारणा केली, तेव्हा घोडं अडलं ते मानधनावरून. कारण त्यावेळी निवड समिती अध्यक्षाला एक कोटी रुपये एवढे मानधन होते, तर निवड समिती सदस्यांना ९० लाख एवढे मानधन होते. पण हे मानधन कमी असल्याचे अजित यांनी दाखवून दिले. अजित यांची ही भूमिका बीसीसीआयला पटली. त्यामुळे त्यांनी याबाबत विचार केला आणि निवड समिती अध्यक्षांचे मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता निवड समिती अध्यक्षांचे मानधन ती़न पटींनी वाढणार आहे. निवड समिती अध्यक्षांचे मानधन वाढवण्याचा निर्णय बीसीसीआयने अजित यांना कळवला आणि त्यानंतर त्यांनी हे पद स्विकारण्याचे ठरवले. त्यामुळे आता अजित आगरकर यांना या पदासाठी जवळपास तीन कोटी रुपये मिळू शकतात, असे म्हटले जात आहे पण याबाबतची अधिकृत घोषणा मात्र बीसीसीायने केलेली नाही.

धोनीला वाढदिवसानिमित्त आंध्र प्रदेशच्या चाहत्यांचे खास गिफ्ट; उभारला 41 फुटांचा कटआऊट

अजित यांनी जोपर्यंत अट पूर्ण केली जात नाही, तोपर्यंत या अजित यांनी या पदासाठी अर्ज केला नव्हता, अशी क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे.

[ad_2]

Related posts