Team India’s squad for T20I series against the West Indies announced ; वेस्ट इंडिजविरुद्धच्या T20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : वेस्ट इंडिज दौऱ्यातील टी-२० माालिकेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या मालिकेसाठी रोहित शर्मााला पुन्हा एकदा संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. पण मुंबई इंडियन्समधील खेळाडूंची मात्र या संघात निवड करण्यात आली आहे.बीसीसीआयच्या वरिष्ठ पुरुष निवड समितीने बुधवारी वेस्ट इंडिजविरुद्ध कॅरिबियन बेटांवर आणि फ्लोरिडा, यूएसए येथे खेळल्या जाणाऱ्या आगामी पाच सामन्यांच्या T20 मालिकेसाठी भारताचा संघ निवडला. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आणि त्यानुसार भारतीय संघ निवडण्यात आला आहे.

वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी भारताचे कसोटी आणि वनडे संघ यापूर्वी निवडण्यात आले होते. या दोन्ही संघांचे कर्णधारपद हे रोहितकडेच आहेत. या दौऱ्यात रोहित टी-२० संघाचे नेतृत्व करेल, असे वाटत होते. पण सध्याच्या घडीला रोहितला बीसीसीआयच्या निवड समितीने टी-२० संघापासून लांब ठेवले आहे. त्यामुळे आता या संघाचे कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे असेल. यापूर्वी हार्दिकने काही मालिकांमध्ये भारताच्या टी-२० संघाचे नेतृत्व केले आहे. पण त्याला हंगामी कर्णधार म्हटले जाते. निवड समितीने अजूनही टी-२० संघाचे कर्णधारपद नेमकं कोणाकडे असेल हे स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे भारताच्या टी-२० संघाच्या नेतृत्वाबाबत सध्या संभ्रमाचे वातावरण आहे.

या संघाचे उपकर्णधार हे पद सूर्यकुमार यादवकडे असेल, त्याचबरोबर संघात दोन यष्टीरक्षक आहेत. इशान किशन आणि संजू सॅमसन असे दोन यष्टीरक्षक या संघात पाहायला मिळत आहे. या संघात यशस्वी जैस्वाललाही संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सच्या तिलक वर्माची या संघात वर्णी लागली आहे. आगामी टी-२० विश्वचषक पाहता हा संघ निवडण्यात आले आहे, असे म्हटले जात आहे.

धोनीला वाढदिवसानिमित्त आंध्र प्रदेशच्या चाहत्यांचे खास गिफ्ट; उभारला 41 फुटांचा कटआऊट

भारताचा संघ: इशान किशन (विकेटकीपर), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, सूर्य कुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार.

[ad_2]

Related posts