3rd Match Of Ashes 2023 Became Do Or Die For England Against Australia ; मालिका वाचविण्याचे इंग्लंडसमोर आव्हान

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लीड्स : चुरशीच्या कसोटी, दर्जेदार क्रिकेट आणि त्याला मिळणारी विविध वादांची फोडणी… अॅशेस कसोटी मालिकेची ही यंदाची विशेषणे आहेत. गुरुवारपासून या मालिकेतील तिसऱ्या कसोटीला सुरुवात होत असून यातून काय मेजवानी मिळणार, याबाबत दर्दी कसोटीप्रेमींना उत्सुकता आहे. पहिल्या दोन कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.

तिसरी कसोटी जिंकून २००१नंतर प्रथमच इंग्लंडमध्ये ॲशेस मालिका जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला उत्सुक आहे. दुसरीकडे, मालिकेतील आव्हान राखण्याचा आटोकाट प्रयत्न यजमान इंग्लंड करणार. त्यामुळे पुन्हा एकदा एक रंगतदार कसोटी बघायला मिळेल याची खात्री बाळगता येईल.

मागील दोन्ही कसोटींत इंग्लंडने विजयाच्या आशा निर्माण केल्या होत्या. मात्र, विजयी समारोप करण्यात बेन स्टोक्सच्या संघाला अपयश आले. पहिल्या कसोटीत कर्णधार पॅट कमिन्सने झुंजार खेळ करून दोन विकेटने ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. दुसऱ्या कसोटीत कर्णधार स्टोक्सने झुंज दिली. मात्र, त्याला इंग्लंडला विजय मिळवून देता आला नाही. आता हेडिंग्लेवर इंग्लंड संघाला सर्वोत्तम खेळ करावा लागणार आहे. यासाठी इंग्लंडने संघात तीन बदलही केले आहेत.
वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन, जोश टंग यांना विश्रांती देण्यात आली असून, खांदा दुखावल्याने उपकर्णधार ओली पोप आधीच संघाच्या बाहेर गेला आहे. या तिघांच्या जागी मोइन अली, ख्रिस वोक्स आणि मार्क वूडची निवड करण्यात आली आहे.

धोनीला वाढदिवसानिमित्त आंध्र प्रदेशच्या चाहत्यांचे खास गिफ्ट; उभारला 41 फुटांचा कटआऊट

पोप संघात नसल्याने हॅरी ब्रुकला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळेल. मोइन अली बोटाच्या दुखापतीतून सावरला आहे. वूडला पहिल्या दोन कसोटींत संधी देण्यात आली नव्हती. अष्टपैलू वोक्समुळे इंग्लंडला फलंदाजीतही मदत मिळणार आहे. ४० वर्षीय अनुभवी अँडरसनला संघाबाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. इंग्लंडची फलंदाजीची मदार झॅक क्रॉली, बेन डकेट, ब्रुक, जो रूट यांच्यावर असणार आहे. यष्टिरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोला अधिक जबाबदारी घ्यावी लागणार आहे. स्टोक्स, मोइन अली आणि वोक्स या तीन अष्टपैलूंची भूमिका महत्त्वपूर्ण असणार आहे.

[ad_2]

Related posts