America Changes Rule Of Citizenship Test; अमेरिकेचं नागरिक व्हायचं स्वप्न पाहताय, तुम्हाला गिरवावे लागणार इंग्रजीचे धडे, जाणून घ्या कारण

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

वृत्तसंस्था, सेंट पॉल : अमेरिकी नागरिकत्व चाचणी अद्ययावत केली जात असल्याने होऊ घातलेल्या बदलांमुळे इंग्रजी कच्चे असलेल्यांना त्रास होईल, अशी चिंता ही चाचणी देऊ इच्छिणाऱ्या स्थलांतरितांना वाटत आहे. ही चाचणी नागरिकत्व मिळवण्याच्या प्रक्रियेतील अंतिम टप्प्यांपैकी एक आहे. ही महिनाभर चालणारी प्रक्रिया असून अमेरिकेत अनेक वर्षे कायदेशीर कायमस्वरूपी निवास केलेल्या व्यक्तींनाच यासाठी अर्ज करता येतो.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने सन २०२०मध्ये चाचणीचे स्वरूप बदलल्यानंतर अनेकांना धक्का बसला होता. या बदलामुळे ती चाचणी उत्तीर्ण होणे अधिक कठीण झाल्याचे त्यांचे मत होते. त्यानंतर काही महिन्यांतच डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांनी पदभार स्वीकारला आणि नागरिकत्वाच्या प्रकियेतील अडथळे दूर करण्याच्या उद्देशाने आदेशावर स्वाक्षरी केली. त्यानंतर नागरिकत्व चाचणी पूर्ववत करण्यात आली. सन २००८मध्ये या चाचणीत शेवटचे बदल करण्यात आले होते. ही चाचणी १५ वर्षांनंतर बदलली जाते. त्यानुसार पुढील वर्षाच्या शेवटी नवीन बदल अपेक्षित आहे, असे डिसेंबरमध्ये अमेरिकी अधिकाऱ्यांनी सांगितले होते.

सार्वजनिक अभिप्राय घेऊन यंदा प्रस्तावित बदलांची देशव्यापी चाचणी होईल. त्यानंतर, भाषा संपादन, नागरिकशास्त्र आणि चाचणी विकास या क्षेत्रांतील तज्ज्ञांचा एक बाह्य गट चाचणीच्या निकालांचे पुनरावलोकन करेल आणि प्रस्तावित बदलांची सर्वोत्तम अंमलबजावणी करण्याच्या मार्गांची शिफारस करेल. हे बदल पुढील वर्षाच्या शेवटी लागू होऊ शकतात. दरम्यान, २०२२मध्ये १० लाखांहून अधिक लोकांना अमेरिकी नागरिकत्व मिळाले. १९०७नंतरची ही सर्वोच्च संख्या आहे.

नेमके काय?

इंग्रजी कौशल्यांचे मूल्यांकन करण्यासाठीच्या नवीन चाचणीमध्ये इंग्रजी बोलण्याची कौशल्ये तपासणारा विभाग असेल, असे ‘यूएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस’ने प्रस्तावित केले आहे. या भागात एक अधिकारी दैनंदिन व्यवहार, हवामान किंवा अन्न यांसारखी छायाचित्रे दाखवून अर्जदाराला त्यांचे तोंडी वर्णन करण्यास सांगेल. सध्याच्या चाचणीमध्ये, एक अधिकारी मुलाखतीदरम्यान वैयक्तिक प्रश्न विचारून बोलण्याच्या क्षमतेचे मूल्यमापन करतो. अर्जदाराने प्रश्नपत्रिकेत या प्रश्नांचे उत्तर आधीच दिलेले असते.

ढोल ताशांच्या गजरात अमेरिकेत गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा साजरा

[ad_2]

Related posts