Heavy rains in mumbai, local delays on central and western line

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबईकडे लोकल ट्रेनने (Mumbai Local) येणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी. मुंबईत सतत पावसाची संततधार सुरु असून दुसरीकडे मध्य (Central Railway) आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे.

दोन्ही मार्गावरील लोकल उशिराने धावत आहेत.  मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू  आहे. तर पश्चिम रेल्वेची वाहतुकही धीम्या गतीने सुरु आहे. त्यामुळे कामासाठी बाहेर निघालेल्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

बुधवारी रात्री टिटवाळ्याकडे जाताना मुंब्रा स्थानकावर येताच मुंबई लोकल ट्रेन घसरल्याची माहिती समोर आली, यामुळे काही काळ सेवा विस्कळीत झाली आणि गाड्यांच्या रांगा लागल्या.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून निघालेली ट्रेन मुंब्रा स्थानकात येत असताना ही घटना घडली. त्यात कोणीही जखमी झाले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, रात्री 9.20 च्या सुमारास धीमी ट्रेन स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर येत असताना ही घटना घडली. यामध्ये कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही. ट्रेनच्या मोटरमनने ताबडतोब ब्रेक लावला आणि डबा प्लॅटफॉर्मवर घासल्याचं समजल्यावर ट्रेन थांबवली.


हेही वाचा

[ad_2]

Related posts