How To Calculate Net Run Rate In Cricket IPL 2023 Playoffs Scenario : मुंबई इंडियन्ससह अनेकांची डोकेदुखी ठरलेले नेट-रनरेट कसं काढलं जाते? कोणत्या गोष्टीचा होतो फायदा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: आयपीएल २०२३च्या हंगामातील प्लेऑफमध्ये पोहोचण्याची चुरस अधिक रंगतदार झाली आहे. १७ मे पर्यंत ६४ लढती झाल्या होत्या. आतापर्यंत फक्त गुजरात टायटन्सने १८ गुणांसह प्लेऑफमधील स्थान निश्चित केले आहे. तर दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ स्पर्धेतून बाहेर झाले आहेत.गुजरात, दिल्ली आणि हैदराबाद वगळता अन्य सात संघ नेट-रनरेटच्या जाळ्यात अडकले आहेत. विशेषत: नेट रनरेटचा मुद्दा मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या दोन संघांसाठी अतिशय महत्त्वाचा ठरला आहे. एक मॅच या दोन्ही संघांचे स्पर्धेतील स्थान टिकवू शकतो किंवा बिघडवू शकतो. ज्या नेट रनरेटवर हे सर्व ठरणार आहे ते कसे काढले जाते. जाणून घ्या…

क्रिकेटमधील सर्वात वादग्रस्त नियम रद्द होणार; ICCचा मोठा निर्णय, सौरव गांगुलीने केले जाहीर
नेट-रनरेट हे कोणत्याही संघाच्या फलंदाजीच्या रनरेटमधून गोलंदाजीचे रनरेटमधून वजा केले जाते. उदा- रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध २० षटकात २०० धावा केल्या आणि नंतर गोलंदाजीत २० षटकात १२० धावा दिल्या तर त्यांचे नेट रनरेट ४ इतके होईल. आरसीबीने २० ओव्हरमध्ये २०० धावा केल्या म्हणून त्याचे फलंदाजीचे रनरेट १० होईल. तर गोलंदाजीत १२० धावा दिल्याने गोलंदाजीचे रनरेट ६ होईल. नेट रनरेट काढण्यासाठी १० मधून ६ वजा केले जातील.

जेव्हा एखादा संघ ओव्हर संपण्याआधी ऑल आउट होतो तेव्हा देखील नेट रनरेट हे संपूर्ण २० ओव्हरच्या आधारावर काढले जाते. उदा-आरसीबीविरुद्ध हैदराबादचा संघ १८ षटकात १०८ धावांवर बाद झाला तरी त्यांचे फलंदाजीचे रनरेट ५.४ इतके होईल. (१०८ धावा/२०=५.४)

IPL खेळणाऱ्या स्टार खेळाडूला मिळाली गुड न्यूज; मोठ्या मुलीसह शेअर केला बाळाचा गोड फोटो
पावसामुळे किंवा अन्य कोणत्या कारणामुळे जर सामना थांबला तर नेट-रनरेट प्रत्यक्षात कराव्याच्या धावांच्या ऐवजी सुधारीत लक्ष्य काय त्यावरून काढले जाते. उदा- आरसीबीने २० षटकात २०० धावा केल्या आणि पावसामुळे हैदराबादला १६ षटकात १८० धावांचे टार्गेट मिळाले तर नेट रनरेट १६ षटकांमध्ये काढलेल्या धावांवर होईल.

MS Dhoni: धोनी तेव्हा खोटं बोलला होता; माजी कर्णधाराने पुराव्यासह शेअर केला व्हिडिओ
प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने संपूर्ण ओव्हर खेळल्या आणि दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ ऑलआउट झाला तर त्यांना नेट रनरेटमध्ये संपूर्ण ओव्हर खेळल्याचा फायदा मिळू शकतो. लीगमध्ये नेट-रनरेट प्रत्येक मॅचनंतर कमी किंवा जास्त होते.

मार्क वूड ठरला IPL 2023 मधील ५ विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज !

[ad_2]

Related posts