Virat Kohli Failed In The First Match In West Indies And Video Became Viral ; कोहली वेस्ट इंडिजमधल्या पहिल्याच सामन्यात ठरला अपयशी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : वेस्ट इंडिजमधल्या पहिल्याच सामन्यात विराट कोहली पुन्हा एकदा अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. विराट कोहलीकडून पुन्हा एकदा तीच चूक घडल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे कोहलीला या सामन्यात फक्त तीन धावांवरच समाधान मानावे लागले.वेस्ट इंडिजमध्ये पोहोचल्यावर भारतीय संघ सरावात मग्न होता. त्यावेळी कोहलीकडून चांगला सराव झाल्याचे पाहायला मिळाले होते. कोहलीचे व्हिडिओ आणि फोटोही चांगलेच व्हायरल झाले होते. त्यामुळे वेस्ट इंडिजमधील पहिल्या सामन्यात त्याच्याकडून चांगली कामगिरी करेल, अशी चाहत्यांना आशा होती. पण वेस्ट इंडिजमधल्या पहिल्याच सामन्यात कोहली अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले.

दोन दिवसीय सराव सामना वेस्ट इंडिजमध्ये सुरु झाला आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी कोहली फलंदाजीला उतरला होता. काही काळ कोहली खेळपट्टीवर होता, तो आता स्थिरावेल असे वाटत होते. पण यावेळी ऑफ स्टम्पच्या बाहेरचा चेंडू मारण्याचा मोह त्याला आवरता आला नाही. ऑफ स्टम्पच्या बाहेरचा चेंडू तो मारण्यासाठी गेला आणि त्याचा झेल स्लीपमध्ये उडाला. भारताचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटने यावेळी कोहलीला तीन धावांवर बाद केले.

कोहली हा गेल्या काही दिवसांमध्ये चांगल्या फॉर्मात होता. पण विश्व अजिंक्यपद स्पर्धेत तो अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले होते. पण तो या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यात चांगली कामगिरी करेल,असा विश्वास त्याच्या चाहत्यांना आहे. पण पहिल्याच सराव सामन्यात तो अपयशी ठरला आहे. या सामन्यानंतर भारतीय संघ अजून एक सराव सामना खेळणार आहे. त्यानंतर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना हा १२ जुलैपासून सुरु होणार आहे. त्यासाठी भारतीय संघ हे सराव सामने खेळत आहे. सध्याच्या घडीला भारतीय खेळाडूंचे दोन संघ तयार करण्यात आले आहेत आणि या दोन संघांमध्ये हे सराव सामने सुरु करण्यात आले आहेत.

धोनीला वाढदिवसानिमित्त आंध्र प्रदेशच्या चाहत्यांचे खास गिफ्ट; उभारला 41 फुटांचा कटआऊट

वेस्ट इंडिजमधल्या पहिल्या सराव सामन्यात कोहली अपयशी ठरला आहे, त्याला फक्त तीन धावा करता आल्या. पण आता अजून एक सामना अजून बाकी आहे, त्यामध्ये दमदार कामगिरी करत कोहली चांगल्या फॉर्मात येऊ शकतो.

[ad_2]

Related posts