MS Dhoni Birthday MSD Fans 52-Feet Cut-out Hyderabad Dhoni 42nd Birthday

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Dhoni Cutout: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचे लाखो चाहते आहेत. शुक्रवारी (7 जुलै) महेंद्र सिंह धोनीचा वाढदिवस आहे, पण त्याआधीच त्याच्या चाहत्यांनी धोनीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची तयारी केली आहे. धोनी अजूनही इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) खेळतो, तो चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कर्णधार आहे. चेन्नईसह अनेक शहरांमध्ये धोनीचे अनेक चाहते आहेत, याचा अंदाज त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून लावता येतो. धोनीच्या वाढदिवसाआधीच सेलिब्रेशनची तयारी सुरू झाली आहे. हैदराबादमध्ये चाहत्यांनी त्याचा उंचच असा कटआऊट लावला आहे.

धोनी 7 जुलै रोजी 42 वा वाढदिवस साजरा करणार आहे, त्याच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी चाहत्यांनी हैदराबादमध्ये 52 फूट उंच कटआऊट लावले आहे. धोनीच्या कटआऊटचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. धोनीच्या फॅन क्लबने कटआऊटचा फोटो ट्विट केला आहे आणि अनेकांना तो आवडला आहे. यासोबतच माहीच्या कटआऊटबाबत सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

धोनीची अविस्मरणीय कामगिरी

विशेष म्हणजे धोनीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द कमालीची राहिली आहे. धोनीच्या नेतृत्वात भारताने विश्वचषकात विजेतेपद पटकावलं. धोनीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अनेक संस्मरणीय सामने खेळले आहेत, त्याने 90 कसोटी सामन्यांमध्ये 4 हजार 876 धावा केल्या आहेत. धोनीने 6 शतकं आणि 33 अर्धशतकं केली आहेत. धोनीने एकदा द्विशतकही झळकावले आहे. त्याने 350 वन-डे सामन्यांमध्ये 10 हजार 773 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 10 शतकं आणि 73 अर्धशतकं झळकावली. धोनीने वनडेत सर्वोत्तम 183 रन्स काढले आहेत. त्याने भारतासाठी 98 टी-20 सामन्यांमध्ये 1 हजार 617 धावा केल्या आहेत, यादरम्यान त्याने दोन शतकं झळकावली आहेत.

एमएस धोनीने आपल्या शानदार कारकीर्दीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळवले आहेत. धोनीला त्याच्या क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल 2009 मध्ये भारताचा चौथा-सर्वोच्च नागरी पुरस्कार – पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आलं. धोनीला एक उत्तम कर्णधार आणि नेतृत्व कौशल्यासाठी 2007 मध्ये राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. 

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे धोनीला 2008 आणि 2009 मध्ये दोनदा ICC ODI ‘प्लेयर ऑफ द इयर’ म्हणून घोषित करण्यात आलं. 2008, 2009 आणि 2013 मध्ये तीन वेळा त्याची ICC ‘कॅप्टन ऑफ द इयर’ म्हणून निवड करण्यात आली. टाईम मॅगझिनने जगातील पहिल्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्यांची नोंद केली होती. तसेच, फोर्ब्स मासिकाने जगातील महान खेळाडूंपैकी एक म्हणून त्याला यादीत स्थान दिलं.

हेही वाचा:

[ad_2]

Related posts