Former Indian Cricketer Praveen Kumar Survives Major Car Accident In Meerut City Uttar Pradesh Maharashra

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Praveen Kumar Car Accident: भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू प्रवीण कुमार (Praveen Kumar) यांचा मेरठ शहरात कारमधून जात असताना मंगळवारी रात्री उशिरा अपघात झाला. त्याच्या कारला भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने धडक दिली, यावेळी प्रवीणसोबत त्याचा मुलगाही कारमध्ये होता. दोघेही या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी कंटेनर चालकाला घटनास्थळावरून ताब्यात घेतलं आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. 36 वर्षीय प्रवीण कुमारने भारतीय क्रिकेट संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले आहेत.

प्रवीण कुमार 4 जुलै रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मेरठमधील पांडव नगर येथून त्याच्या लँड रोव्हर डिफेंडर कारने येत होता. यानंतर त्याची कार आयुक्तांच्या निवासस्थानाजवळ पोहोचली असता समोरून येणाऱ्या कंटेनरने त्याच्या कारला जोरदार धडक दिली.यामध्ये क्रिकेटपटूच्या गाडीचं जबर नुकसान झालं. या अपघातात प्रवीण आणि त्याचा मुलगा किरकोळ बचावले.

अपघातानंतर सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून कंटेनर चालकाला ताब्यात घेतलं. या अपघाताबाबत सीओने सांगितलं की, प्रवीण कुमार आणि त्याचा मुलगा पूर्णपणे सुरक्षित आहेत. प्रवीण कुमार यांचे घर मेरठ शहरातील बागपत रोडवर असलेल्या मुलतान नगरमध्ये आहे.

अपघात झालेल्या कारची किंमत किती?

सिव्हिल लाइन कमिश्नरी चौकात हा अपघात झाला. पोलिसांना या उपघाताची माहिती मिळताच ते तातडीने अपघातस्थळी पोहोचले. पोलिसांनी कंटेनर चालकाला अटक केली. प्रवीण कुमारच्या अपघातग्रस्त कारची किंमत 2.50 कोटी रुपये इतकी आहे.

भारतीय संघासाठी प्रवीण कुमारचं चांगलं योगदान

प्रवीण कुमारच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, एकेकाळी तो टीम इंडियासाठी मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये मुख्य गोलंदाजाची भूमिका बजावत होता. जेव्हा भारतीय संघाने 2008 मध्ये ऑस्ट्रेलियात सीबी मालिका जिंकली, त्यावेळी त्यात प्रवीण कुमारने गोलंदाज म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती.

सध्या प्रवीण कुमार भारतीय टीमचा भाग नाही. त्याच्या बळावर टीम इंडियाने अनेक सामने जिंकले आहेत. प्रवीण कुमार याला टीम इंडियाकडून 6 कसोटी, 68 वनडे आणि 10 T-20 सामने खेळण्याची संधी मिळाली. 68 वनडे सामन्यांत प्रवीण कुमारने 77 विकेट घेतले. 10 T-20 सामन्यांत 8 विकेट आणि 6 टेस्ट मॅचमध्ये 27 विकेट घेतल्या. 2007 मध्ये प्रवीण कुमारने पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. मार्च 2012 पासून प्रवीण कुमार एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. आयपीएलमध्येही तो 2017 मध्ये शेवटचा खेळला होता.

हेही वाचा:

MS Dhoni Birthday: महेंद्र सिंह धोनीचा थरारक जीवन प्रवास! कॅप्टन कूलपासून ते निवृत्तीपर्यंत सगळ्यांचीच मनं जिंकली

[ad_2]

Related posts