Pune Crime News Maval MLA Sunil Shelke’s Brother’s Murder Plot Foiled By Police Pune Maharashtra

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune News:  पुण्याच्या तळेगावमधील किशोर आवरेंच्या हत्येचा बदला घेण्यात येणार होता. पण पिंपरी चिंचवड पोलिसांनी हा कट उधळून लावला. प्रमोद सांडभोर आणि शरद साळवे या दोघांना पिस्टल आणि जिवंत काडतुसांसह बेड्या ठोकल्यानंतर ही धक्कादायक बाब उघड झाली. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या भावाची हत्या करण्यात येणार असल्याचे तपासात समोर आले. 

किशोर आवरेंच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मावळचे आमदार सुनील शेळकेंच्या भावाची खून केला जाणार होता. हे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. हत्येचा कटात सहभागी असणाऱ्यांपैकी आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सात पिस्टल आणि एकवीस जिवंत काडतुस जप्त करण्यात आलीत. दोन आठवड्यापूर्वी प्रमोद सांडभोर आणि शरद साळवीला बेड्या ठोकल्या होत्या. त्यांनीच हा हत्येचा कट रचल्याचं सांगितलं होतं. मात्र त्यावेळी किशोर आवरेंच्या हत्या प्रकरणाचा बदला घेण्यासाठी कोणाची हत्या केली जाणार? हे अस्पष्ट होतं. 

पुढील तपासात आणखी सहा आरोपींची नावं निष्पन्न झाली. त्यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली. या सर्वांकडे चौकशी केली तेंव्हा मावळचे आमदार सुनील शेळके यांचे भाऊ सुधाकर शेळके आणि संदीप गराडे यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता. अशी कबुली या आरोपींनी दिली. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे विभागाने हा हत्येचा कट उधळून लावला.

जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवरेंची हत्या गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून झाली होती. 12 मे रोजी झालेल्या या हत्येप्रकरणी पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी चौघांना बेड्या ठोकल्या होत्या. तर तिसऱ्या दिवशी आवरेंच्या संघटनेचे माजी नगरसेवक भानू खळदेंचा मुलगा गौरवला अटक करण्यात आली. तर पुढील चौकशीत भानू खळदेंचं या हत्येचे मास्टरमाइंड असल्याचं समोर आलं होतं. याप्रकरणाची चार्ज शीट दाखल व्हायला अद्याप अवधी आहे. ती न्यायालयात दाखल झाल्यानंतर प्रमोद, शरद आणि इतर सहकारी आवरेंच्या हत्येचा बदला घेण्याच्या तयारीत होते. यासाठी त्यांनी चार पिस्टल आणि चौदा जिवंत काडतुसे आणली होती. असा कट रचल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेला लागली आणि त्यांना कट उधळून लावला. 

आरोपी प्रमोद आणि शरद दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. किशोर आखरेंचा निकटवर्तीय म्हणून प्रमोदची तर आवरेंना फॉलो करणारा म्हणून शरदची ओळख आहे. अन्य तिघांचा शोध सुरू आहे. त्यांच्या टार्गेटवर नेमके कोण होते आणि त्यांना कोणी सुपारी दिली होती का? याबाबतचा तपास पोलीस करत आहेत. 

[ad_2]

Related posts