Big Move By West Indies To Beat India ; भारताला हरवण्यासाठी वेस्ट इंडिजची जोरदार तयारी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अँटिगा : भारतात रंगणाऱ्या वनडे वर्ल्ड कपसाठी वेस्ट इंडिज संघ पात्र ठरू शकला नाही. ४८ वर्षांच्या वर्ल्ड कप इतिहासात प्रथमच त्यांच्यावर अशी नामुष्की आली. आता किमान घरच्या मैदानावरील भारताविरुद्धच्या मालिकांमध्ये (कसोटी/वनडे/टी-२०) तरी यश मिळवावे या दृष्टिने त्यांनी पावले टाकायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आव्हानच संपुष्टात आलेल्या वनडे वर्ल्ड कपची प्राथमिक फेरी अर्धवट सोडून अष्टपैलू जेसन होल्डन आणि वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ मायदेशी परतणार आहेत.

येत्या १२ जुलैपासून भारताच्या विंडीज दौऱ्याला सुरुवात होते आहे. त्याआधी जोसेफ आणि होल्डर यांना पुरेशी विश्रांती मिळावी. यासाठी हा निर्णय झाला आहे.
‘जेसन होल्डर आणि अल्झारी जोसेफ आयसीसी वर्ल्ड कप प्राथमिक फेरीतील अखेरच्या दोन लढतींना मुकणार आहेत. ते मायदेशी कॅरेबियन बेटांवर परततील. भारताविरुद्धच्या आगामी मालिकांचा विचार करता त्यांच्यावरील कार्यभार कमी व्हावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे’, असे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने आपल्या ट्विटर हँडरवर नमूद केले आहे.

प्राथमिक फेरीच्या सुपर सिक्समधील बुधवारी होणाऱ्या सामन्यात विंडीजची गाठ ओमानशी पडणार आहे. तर शुक्रवारच्या लढतीत विंडीजला श्रीलंकेशी दोन हात करायचे आहेत. विंडीज दौऱ्यावर भारतीय संघ दोन कसोटींच्या मालिकेत भाग घेईल. यातील पहिली कसोटी १२ जुलैपासून डॉमिनिका येथे सुरू होईल. तर दुसऱ्या कसोटीचे आयोजन २० जुलैपासून पोर्ट ऑफ स्पेनला होईल. या कसोटी मालिकेनंतर प्रत्येकी तीन वनडे आणि टी-२० लढतींच्या मालिका होतील.

धोनीला वाढदिवसानिमित्त आंध्र प्रदेशच्या चाहत्यांचे खास गिफ्ट; उभारला 41 फुटांचा कटआऊट

विंडीज क्रिकेट संघाचे हित डोळ्यापुढे ठेवूनच होल्डर, जोसेफ माघारी येत असल्याचे विंडीजच्या निवड समितीचे प्रमुख डेसमंड हेनेस यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, ” होल्डर, जोसेफ हे भारताविरुद्धच्या मालिकेत विंडीजचे हुकमी मोहरे ठरतील. अशा खेळाडूंना मालिकेच्याआधी विश्रांती देणे आवश्यक आहे. आपल्या आगामी मालिकांचा कार्यक्रम पाहून विंडीजने नियोजन केले असून जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या मालिकांबाबत ते अधिक गांभीर्याने विचार करत आहेत. “

[ad_2]

Related posts