Wife Cheated Husband And Secretly Married With Another Person Uttar Pradesh; माहेरी गेलेल्या बायकोने लपून दुसरं लग्न केलं

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लखनऊ: एक व्यक्ती आपल्या मुलीसह पोलिसांत पोहोचला. ही व्यक्ती आपल्यासाठी न्यायाची मागणी करत आहे. या व्यक्तीच्या पत्नीने तिला धोका दिल्याने ही व्यक्ती पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचली. या व्यक्तीचे ९ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. पण, वर्षभरापूर्वी त्याची पत्नी काहीही न सांगता मुलीसह माहेरी निघून आली. जेव्हा तो या दोघींना घेण्यासाठी सासरी पोहोचला तेव्हा त्याला धक्काच बसला.

जेव्हा तो सासरच्या घरी पोहोचला तेव्हा त्याला समजले की त्याच्या पत्नीने दुसरे लग्न केले आहे. त्यानंतर तो आपल्या मुलीला घेऊन सासरच्या घरून परतला. त्यानंतर तरुणाने आता पोलिसांकडे पत्नीवर कारवाईची मागणी केली आहे. पत्नीने घटस्फोट न घेता लग्न केले, अशी तरुणाची मागणी आहे. अशावेळी तिच्यावर कारवाई व्हायला हवी. सध्या पोलिस या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.

उपचाराऐवजी नर्सने रुग्णासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले, काहीच वेळात हार्ट अटॅकने मृत्यू
हरदोईमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीसह एका व्यक्तीने पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले. इंद्रभूषण सिंग असे या तरुणाचे नाव आहे. हुसेपूर करमाया गावातील रहिवासी इंद्रभूषण सिंह आपल्या पत्नीची तक्रार घेऊन तिच्या ४ वर्षांच्या मुलीसह आणि कुटुंबासह एसपी कार्यालयात पोहोचला.

अखेर एलियन्सच्या घराचा पत्ता सापडला, ‘या’ ग्रहावर आहे वास्तव्य, शास्त्रज्ञांच्या हाती मोठी माहिती
इंद्रभूषण सांगतात की, ९ वर्षांपूर्वी २०१४ मध्ये प्रतापगड जिल्ह्यातील विक्रमपूर येथील रहिवासी रामसिंग यांची मुलगी पूनम हिच्याशी त्यांचा विवाह झाला होता. लग्नाच्या ५ वर्षानंतर त्यांना मुलगी झाली, काही वर्षे सर्व काही सुरळीत सुरु होते. पण, गेल्या वर्षी त्यांच्या गैरहजेरीत पत्नी पूनम मुलीला घेऊन माहेरी निघून आली.

तरुणीवरील हल्ल्याने पुणे सुन्न! बचावास गेलेले अनेक जण जखमी; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक अनुभव

बराच काळ होऊनही त्याची पत्नी परत न आल्याने तो सासरच्या घरी गेलाय तेव्हा त्याच्या पत्नीने दुसरं लग्न केल्याचं समजले. पत्नीने दुसरं लग्न केल्याचं ऐकून तो आपल्या मुलीला घेऊन गावी परत आला. पत्नीच्या अशा वागण्याने दुखावलेल्या इंद्रभूषणने आता पत्नीवर कारवाईची मागणी केली आहे.

[ad_2]

Related posts