Twitter Threatens To Sue Meta Over Threads All Details About Twitter Killer App Social Media

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Threads New Social App of Meta : मेटा कंपनीने नुकतंच थ्रेड्स (Threads) हे नवीन सोशल मीडिया अ‍ॅप लाँच केलं आहे. पहिल्याच दिवशी कोट्यवधी युजर्सने थ्रेड्स (Threads) ला पसंती दर्शवली आहे. थ्रेड्स (Threads) अ‍ॅप ट्विटरला टक्कर आहे. पहिल्याच दिवशी थ्रेड्स व्हायरल होत आहे. थ्रेड्सच्या लाँचिंगमुळे ट्विटरला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ट्विटरच सीईओ एलॉन मस्क यांनी धसका घेतल्याचं दिसत आहे. आता ट्विटरने मेटाच्या थ्रेड्सवर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली आहे. 

ट्विटरची थ्रेड्सला धमकी, मेटावर कारवाईचा इशारा

मेटाने 6 जुलै रोजी लाँच केलेलं थ्रेड्स अ‍ॅप एलॉन मस्क यांच्या मालकीचं मायक्रो-ब्लॉगिंग अ‍ॅप ट्विटरला टक्कर देणार आहे. एकीकडे ट्विटरकडून विविध बदल करण्यात येत असताना आता थ्रेड्स ट्विटर समोरील सर्वात मोठं आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर आता ट्विटरने मेटा कंपनीला थ्रेड्स विरोधात खटला दाखल करण्याची धमकी दिली आहे.

ट्विटरचं मेटाचे मालक झुकरबर्ग यांना पत्र

काही मीडिया रिपोर्टनुसार, आता ट्विटरने मेटाच्या नवीन थ्रेड्स प्लॅटफॉर्मवर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. सेमाफोनच्या वृत्तानुसार, ट्विटरने मेटाच्या नवीन थ्रेड्स अ‍ॅपवर कायदेशीर कारवाईची धमकी दिली आहे. यासंदर्भात ट्विटरचे वकील अॅलेक्स स्पिरो यांनी फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना पत्रही पाठवलं आहे.

कॉपीराइटवरून वाद

दरम्यान, ट्विट आणि थ्रेड्समधील वाद कॉपीराइटवरून असल्याची माहिती समोर येत आहे. थ्रेड्सचं स्वरुप (Interface) ट्विटरसारखाच असल्याचा दावा ट्विटरने केला आहे. याशिवाय ट्विटरवर थ्रेड नावाचं फीचर आहे. जेव्हा एक जास्त शब्दांचं ट्विट अनेक भागांमध्ये विभागलं जातं, तेव्हा ते थ्रेडमध्ये विभागलं जातं. यामुळे ट्विटरने थ्रेड्सवर कॉपीराइटचा दावा केला आहे. या अहवालावर मेटा कंपनीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

काय आहे थ्रेड्स?

मेटा कंपनीने थ्रेड्स हे नवीन मायक्रोब्लॉगिंग अॅप लाँच केलं आहे. इंस्टाग्रामच्या टीमनेच थ्रेड्स अॅप बनवलं आहे. थ्रेड्समध्ये रिअल टाइम फीड देखील उपलब्ध असेल. थ्रेड्सची फिचर्स आणि संवाद साधण्याची पद्धत ट्विटरप्रमाणे आहेत. थ्रेड्स भारतासह 100 देशांमध्ये लाँच करण्यात आलं आहे. तुम्ही गुगल प्ले-स्टोअरवरून थ्रेड्स अॅप डाउनलोड करु शकता. तुम्ही इंस्टाग्राम अकाऊंटवरून थ्रेड्सवर अकाऊंट सुरु करु शकता. जर तुमच्याकडे इंस्टाग्रामवर आधीपासून ब्लू टिक असेल म्हणजेच तुमचे इंस्टाग्राम खाते आधीच व्हेरिफाईट असेल तर थ्रेड्स अकाऊंटही आपोआप व्हेरिफाईट होईल.

[ad_2]

Related posts