Maharashtra News Nashik News MNS President Raj Thackeray’s Three-day Visit To Nashik

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nashik Raj Thackeray : गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय वातावरण (Maharashtra Politics) चांगलंच तापले असून प्रत्येक पक्ष आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोटबांधणी करताना दिसून येत आहे. दुसरीकडे मनसेचे इंजिन देखील रुळावर येण्यासाठी चांगलाच जोर देत आहे. एकीकडे मनसेचा एकेकाळचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकवर मनसेने (MNS) पुन्हा एकदा नवनिर्माण करण्याचे ठरवल्याचे मागील काही बैठकांवरुन दिसून येत आहे. याच नेत्यांमध्ये पुन्हा एकदा जोश भरण्यासाठी खुद्द मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या नाशिक (Nashik) दौऱ्यावर येत आहेत. 

आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्षांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये प्राण फुंकण्याचे काम नेतेमंडळी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज नाशिकच्या दौऱ्यावर येणार आहेत. 19 ते 21 मे च्या दरम्यान ते नाशिकमध्ये तळ ठोकून असणार आहेत. आता लवकरच महापालिकेच्या निवडणुका होतील असा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे ते संघटनात्मक आढावा घेणार आहेत. राज ठाकरे (Raj Thackeray) यांना नाशिक महापालिकेत सर्वप्रथम 2012 ते 2017 सत्ता मिळाली होती. तसेच 2009 मध्ये नाशिकमधून तीन आमदार निवडून आले होते. त्यामुळेच आता राज यांनी पुन्हा नाशिकमध्ये लक्ष घातल्याची चर्चा आहे.  

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवसीय नाशिक दौऱ्यावर असून आज संध्याकाळच्या सुमारास राज ठाकरेंचं नाशकात आगमन होणार आहे. गेल्या अनेक महिन्यानंतर राज ठाकरें नाशिक मुक्कामी येणार असून या दौऱ्यात राज ठाकरे शाखाध्यक्ष आणि स्थानिक कार्यकारणी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. याच सोबत शेतकरी संघटनेसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची देखील राज ठाकरे भेट घेणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक मनसे नेते पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे काय आदेश देतात याकडे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर उद्या राज ठाकरेंची नाशिकमध्ये पत्रकार परिषद देखील होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शहराध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर नवीन शहराध्यक्ष राज ठाकरे नेमणार का याकडे ही कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. 

तीन दिवस घेणार संघटनेचा आढावा

सव्वा वर्षापासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही पावसाळ्यानंतर होण्याची शक्यता आहे. मुंबई, नाशिक, पुणे या महत्त्वाच्या महापालिकांसह राज्यातील 18 महापालिकांच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याचा अंदाज आहे. त्यासाठी राज ठाकरे प्रथम नाशिकच्या मैदानात उतरत आहेत. या दौऱ्यात राज ठाकरे शाखाप्रमुख, विभागप्रमुख, शहर पदाधिकाऱ्यांशी व्यक्तिश: चर्चा करणार आहेत. रविवारी क्रेडाईसह विविध संघटनांशी ते संवाद साधणार आहेत. या तीन दिवसांत ते नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगावसह छत्रपती संभाजीनगर या पाच जिल्ह्यांतील संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत. संघटनेचा आढावा घेतानाच या पाच जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसंदर्भातील रणनीती ठरविली जाणार आहे. शासकीय विश्रामगृहावर या बैठका होतील. त्यासाठीची तयारी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सुरु केली आहे.

[ad_2]

Related posts