[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Pune Weather Update : विकेंड किंवा रविवार आल्याने (Pune Weather Update) पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरात प्रवास किंवा पर्यटनाला (Weekend Plan) जाण्याचा प्लॅन करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. पुणे आणि पुण्याच्या आजुबाजूच्या परिसरात मागील काही दिवस पाऊस सुरु आहे. शहरात फार पाऊस नसून घाटमाध्यावर आणि लोणावळ्याच्या परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे आणि पुढील दोन दिवस पुणे जिल्ह्यात येलो अलर्ट जारी (yellow alert) करण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार (India Meteorological Department) पुणे जिल्ह्यात 8 आणि 9 जुलै रोजी ‘घाट परिसरातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुण्यात सोमवारपासून (10 जुलै) पावसाचा जोर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात 9 आणि 10 जुलै रोजी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जिल्ह्यातील घाट भागात गेल्या 24 तासांत चांगला पाऊस झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत ताम्हिणी घाटात 210 मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर लोणावळ्यामध्ये 103 मिमी आणि शिरगाव, मावळमध्ये 168 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहराच्या हद्दीसह जिल्ह्याच्या इतर भागात अद्याप चांगला पाऊस झालेला नाही.
प्रवास करताना काळजी घ्या…
पावसाचा जोर वाढणार असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रविवार असल्याने अनेक तरुण मंडळी ट्रेकला किंवा वर्षा विहाराला निघत असतात. मागच्या रविवारी लोहगडावर तीन तास अडकले होते. त्यावेळी अनेक पर्यटकांची गैरसोय झाली होती. यावेळी देखील रविवारी पर्यटनाला जाताना काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे. घाटमाध्यावर प्रवास करत असताना धुक्याची चादर असते. त्यामुळे वाहन चालवतानादेखील काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
मराठवाड्यात आणखी पावसाची गरज..
कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील हवामान उपविभागांमध्ये चांगला पाऊस पडला आहे. ज्यामुळे राज्यात पावसाचं प्रमाण चांगलं आहे. मात्र मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुरेसा पाऊस झाला नाही आहे. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, 1 जून ते 4 जुलै दरम्यानच्या पावसाचा अंदाज घेतला तर सध्या राज्यात 38 टक्के पावसाची गरज आहे. तर कोकण आणि गोवा आणि मध्य महाराष्ट्र उपविभागांमध्ये पावसाची 13टक्के आणि 38टक्के पावसाची गरज आहे. मराठवाड्यात चारही उपविभागांमध्ये 64 टक्के पावसाची गरज आहे तर विदर्भात आणखी 56 टक्के पावसाची गरज आहे.
[ad_2]