[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
रेल्वे बोर्डाने जाहीर केल्यानुसार प्रवाशांसाठी सवलत भाडे योजना सुरू केली आहे. रेल्वेतील जागांचा पूर्ण उपयोग करण्याच्या उद्देशाने रेल्वे मंत्रालयाने एसी सिटिंग गाड्यांच्या भाड्यात सवलत देणारी योजना सुरू करण्याचे ठरवले आहे. या संदर्भातील अधिकार प्रत्येक विभागाला देण्यात आले आहे. प्रवाशांच्या संख्येच्या आधारावर २५ टक्क्यांपर्यंत दर कमी होणार आहे.
कोणत्या प्रवाशांना मिळणार फायदा
रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार ही योजना एसी चेअर कार आणि सर्व एसी सिटिंग गाड्यांच्या एग्जिक्यूटिव्ह क्लेसेसला लागू होणार आहे. या गाड्यांच्या भाड्यात प्रवाशांच्या संख्येच्या आधारावर २५ टक्क्यांपर्यंत तिकीट दरात सवलत मिळणार आहे.
आदेशात म्हटल्यानुसार, ही सवलत मुळ तिकीट दरात जास्तीत जास्त २५ टक्के इतकी होऊ शकते. आरक्षण शुक्ल, सुपरफास्ट सरचार्ज, जीएसटी सारके अन्य शुल्क स्वतंत्र आकारले जातील. गाड्यातील प्रवाशांच्या संख्येच्या आधारावर कोणत्याही श्रेणीत किंवा सर्व श्रेणीत सवलत दिली जाऊ शकते. गेल्या ३० दिवसाच्या दरम्यान ५० टक्के पेक्षा कमी प्रवासी असलेल्या श्रेणीत अशा प्रकारची सवलत देण्याचा विचार केला जाऊ शकतो.
सवलत भाडे योजना ही तातडीने लागू केली जाणार आहे. मात्र ज्यांनी आधीच तिकिटे बुक केली आहेत त्यांना या सवलतीचा लाभ मिळणार नाही, असे या आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे. हा आदेश देताना रेल्वे बोर्डाने हे देखील म्हटले आहे की, ही सवलत सणा-सुदीच्या काळात चालवल्या जाणाऱ्या स्पेशल गाड्यांसाठी लागू होणार नाही.
[ad_2]