( प्रगत भारत । pragatbharat.com)
Moon-Jupiter Conjunction : ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाला स्वतःचं महत्त्व आहे. प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधी पूर्ण केल्यानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. याचा ग्रह गोचर असं म्हणतात. सर्व ग्रहांमध्ये चंद्राचा कालावधी सर्वात कमी असतो. चंद्र अडीच दिवसात त्याच्या राशीमध्ये बदल करतो. अशा स्थितीत 10 जुलै रोजी चंद्र मेष राशीत प्रवेश करणार आहे.
दरम्यान गुरू ग्रह आधीच मेष राशीत बसला आहे. त्यामुळे गुरु ग्रहाची चंद्रासोबत युती होणार आहे. कोणतेही दोन ग्रह एकाच राशीत एकत्र आल्यास शुभ आणि अशुभ परिणाम मिळतात. गुरू आणि चंद्राच्या संयोगामुळे काही राशीच्या लोकांच्या जीवनात शुभ परिणाम प्राप्त होणार आहेत. जाणून घेऊया कोणत्या राशींना या संयोगाचा शुभ परिणाम मिळणार आहे.
मेष रास
ज्योतिषशास्त्रानुसार, दोन्ही ग्रहांच्या संयोगाचा चांगला प्रभाव मेष राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. या काळात प्रत्येकाच्या कामात सुधारणा दिसून येणार आहे. व्यावसायिकांच्या आयुष्यात यशाचा काळ सुरू होणार आहे. वैवाहिक जीवनात गोडवा येणार आहे. घरात आनंदी वातावरण राहणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणार आहे.
कर्क रास
कर्क राशीच्या लोकांना देखील मेष राशीमध्ये झालेल्या चंद्राच्या प्रवेशामुळे अनुकूल परिणाम मिळतील. यावेळी खूप आर्थिक फायदा होईल. नात्यामध्ये काही ताणतणाव असतील तर ते दूर होणार आहेत. उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडणार आहेत. कुटुंबियांचं खास सहकार्य लाभेल. नशीब तुमच्या सोबत असणार आहे. अनपेक्षित धनलाभ होण्याची चिन्ह आहेत.
धनू रास
ज्योतिष शास्त्रानुसार, धनु राशीच्या लोकांच्या जीवनावर दोन ग्रहांच्या संयोगाचा विशेष प्रभाव दिसून येतो. धनु राशीच्या लोकांसाठीही हा काळ अतिशय शुभ असणार आहे. तुमची काही रखडलेली कामं असतील तर ती पूर्ण होतील. दुसरीकडे, जर तुम्ही कोणत्याही धार्मिक कार्याशी संबंधित असाल तर तुम्हाला त्या कार्यात यश मिळणार आहे. नोकरीच्या ठिकाणी मनाजोगं काम होणार आहे.
( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )