Ashadhi Wari 2023 A Hindu Disciple Of Becomes Priest Of Angadhbaba Shah Dargah Sant Tukaram Maharaj

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ashadhi Wari 2023 : आषाढी वारीचा सोहळा सर्व धर्मियांना एकाच छताखाली आणतो. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होताच, हिंदू-मुस्लीम एकतेचं दर्शन घडतं. पालखीचा पहिल्याच विसावा हा हजरत अनगडशाह बाबांच्या दर्गा मंदिरात असतो. महाराज आणि बाबा असणारं गुरु-शिष्याचं नातं आजही जपलं जातं. त्यामुळेच पंढरपूरकडे मार्गस्थ होतानाच सर्वात आधी वारकरी बाबांच्या चरणी नतमस्तक होतात. विशेष म्हणजे या दर्ग्याच्या पुजाऱ्याचा मान हा मुसुडगे या हिंदू कुटुंबाला आहे. 

गोविंद मुसुडगे हे अनगडशाह बाबा दर्ग्याचे पुजारी आहेत. त्यांच्या तीन पीढ्या या दर्ग्याची देखभाल करतात. त्याच्या आजोबांनी या दर्ग्याची सेवा करायला सुरुवात केली होती. त्यानंतर काही वर्ष त्यांच्या वडिलांनीदेखील या ठिकाणी सेवा दिली. या दोघांनंतर 2009 पासून गोविंद मुसुडगे दर्ग्यात सेवा देत आहेत. ते सांगतात की, आम्ही आणि आमचं कुटुंब मनोभावे या दर्ग्याची सेवा करतो आणि करत राहू.

‘तुकाराम महाराजांनी त्यांच्या जमिनीचा काही भाग  अनगडबाबा शाह यांना दिला’

तुकाराम महाराजांचे वंशज माणिक महाराज मोरे सांगतात की, “तुकाराम महाराजांची जीवन प्रणाली ज्या तत्वाने कार्यरत झाली ही सर्वधर्मसमभावाचं तत्व आहे. याच भक्ती सांप्रदायाच्या चळवळीमध्ये तुकाराम महाराजांना सगळ्या धर्माच्या लोकांनी मदत केली आहे. त्यामुळे भक्ती सांप्रदायाचं हे प्रतिक हे मंदिर आहे. भक्ती सांप्रदायाचा आणि वारकरी सांप्रदायाचा पाया रचला त्याचा कळस हा सगळ्यांनी मदत केली म्हणून उभा राहिला. त्यांनी अनेकांचा उद्धार केला आहे जात पात बाजूला ठेवून काम केलं आहे. त्याकाळी अनगडबाबा शाह तुकारामांसोबत कीर्तनालादेखील जात असत. त्यानंतर तुकाराम महाराजांनी त्यांच्या जमिनीचा काही भाग अनगडबाबा शाह यांना दिला होता. त्यामुळे मागील शेकडो वर्षांपासून पालखी प्रस्थान झालं की पहिली कीर्तन आरती या अनगडबाबा शाह यांच्या दर्ग्यात होते आणि पहिला विसावादेखील याच दर्ग्यात होतो. 

‘हिंदू मुस्लिमांच्या वादाचा दर्ग्यावर परिणाम नाही’

राज्यात अनेक ठिकाणी हिंदू मुस्लिमांचे वाद आणि तेढ निर्माण झाल्याचं आपण पाहिलं आहे. मात्र मागील शेकडो वर्षात या वादाचा पालखी सोहळ्यावर किंवा अनगडबाबा शाह यांच्या दर्ग्यावर कोणताही परिणाम झाल्याचं दिसलं नाही आहे. त्यावर बोलताना तुकाराम महाराजांचे वंशज माणिक महाराज मोरे सांगतात की, “जे लोक संतांच्या विचाराशी सहमत होतात त्यावेळी संत हे धर्माच्या पलीकडे असतात. जोपर्यंत माणसाला एखाद्या गोष्टीचा खरा अर्थ कळत नाही तोपर्यंत कोणताही माणूस काठीचा आधार घेऊन चालत असतो. मात्र ज्यावेळी जगाचं कल्याण संतांना कळतं त्यावेळी संत समाजाला आणि मानवतेला नतमस्तक होत असतं.” 

संबंधित बातमी-

Ashadhi Wari 2023: जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या आषाढी पालखी सोहळ्याची घोषणा, 10 जूनला पंढरपूरसाठी प्रस्थान

[ad_2]

Related posts