Maharashtra News Nashik News Nashik FDA Destroyed 3 Thousand Liters Of Milk Stock In Sinner Ghoti Highway

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nashik Bogus Milk : मुंबईला (Mumbai) दूध घेऊन जाणाऱ्या टँकरची अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त पथकाने नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यातून जाणाऱ्या दूध टँकरच्या अचानक तपासणी केली. यात संगमनेर तालुक्यातील एका कंपनीच्या वाहनात भेसळयुक्त दूध आढळल्याने टँकरमधील दुधाचे नमुने घेऊन तीन हजार 20 लिटर दूध जागेवर नष्ट करण्यात आले. 

नाशिक शहरात येणारे आणि जिल्ह्यातून मुंबईला वितरित होणाऱ्या दूध भेसळ तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनाकडून मोहीम राबवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमार्गे मुंबईच्या दिशेने दुधाची वाहतूक करणारे चार संशयित टँकर अन्न औषध प्रशासनाच्या पथकाने तपासणी दरम्यान रोखले. यावेळी एका टँकरमध्ये दुधात चक्क भेसळ (Adulterated milk) केल्याचे आढळून आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. पथकाने सुमारे 3 हजार लीटर भेसळ दुधाचा दीड लाख रूपये किमतीचा साठा नष्ट करण्यात आला आहे. नाशिक शहरात येणारे व नाशिकमधून (Nashik) मुंबईला विक्रीसाठी दुधाची वाहतूक करणाऱ्या टँकरची अचानकपणे तपासणी मोहीम राबविली. 

3 हजार लिटर दूध पाण्यात 

सिन्नर-घोटी महामार्गावरील भाटेवाडी गावाजवळ ही तपासणी करण्यात आली. या मोहिमेत एकूण चार अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. विश्लेषण अहवाल येताच अन्नसुरक्षा व मानके कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे. एकूण चार वाहनातील 66 हजार 763 लिटर दुधाचा साठा जागेवर तपासण्यात आला. या तपासणीत संगमनेर तालुक्यातील कासार सुवर्णा दुमाला येथील मे. प्रवरा मिल्क प्रोसेसिंगचा दुधाच्या टँकरमध्ये दुधात भेसळयुक्त पदार्थ असल्याचे चाचणीत निष्पन्न झाले. टँकरमधील दुधाचा नमुना विश्लेषणासाठी घेऊन उर्वरित एक लाख 53 हजार 250 रुपये किमतीचा दुधाचा साठा नाशवंत असल्याने जन आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने जागेवर तत्काळ नष्ट करण्यात आला. 

अन्न व औषध विभागाचे आवाहन 

सर्व दूध संकलन व शेतकऱ्यान केंद्रांनी कायद्यानुसार आवश्यक अन्न सुरक्षा परवाना घेऊनच दूध खरेदी विक्री करावी, दूध व्यवसायिकांनीही परवानाधारक दूध संकलन केंद्राकडून दूध खरेदी करण्याची दक्षता घ्यावी, अन्न औषध प्रशासनाकडून यापुढेही धडक मोहीम सुरू राहणार आहे, अशी माहिती सहआयुक्त संजय नारागुडे यांनी दिली. दरम्यान ही मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. अन्न व्यवसायिकांनी दूध हे अन्नपदार्थात भेसळ करू नये, आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. नागरिकांना दूध भेसळी बाबत माहिती मिळाल्यास प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन देखील नारागुडे यांनी केले आहे.

 

Satara Milk : दुध भेसळ करणाऱ्या टोळीला सातारा पोलिसांनी पकडलं, 9 हजार लिटर बनावट दूध जप्त

 

[ad_2]

Related posts