UPSC CSE Result Declaired Maharashtra Toppers List;युपीएससीचा निकाल जाहीर, पाहा महाराष्ट्रातील टॉपर्सची यादी

( प्रगत भारत । pragatbharat.com)

UPSC CSE Result: केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील मराठी उमेदवारांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे. 

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ऑल इंडिया रॅंकींनुसार अर्चित डोंगरे यास 153रॅंक, अनिकेत हिरडे 91 रॅंक तर प्रियांका मोहीतेला 595 रॅंक मिळाली आहे. 

केंद्रीय लोकसेवा आयोगाने सिव्हिल सेवा परीक्षा 2023 चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत आदित्य श्रीवास्तवने टॉप केलंय अनिमेष प्रधान दुसऱ्या स्थानी दर दोनुरु अनन्या रेड्डी तिसऱ्या स्थानी आहे. पीके सिद्धार्थ रामकुमार चौथ्य स्थानी आणि रुहानी पाचव्या स्थानी आहे. 

आयएएस, आयएफएस आणि आयपीएससहित 1143 रिक्त जागांसाठी 1016 उमेदवारांच्या नियुक्तीची शिफारस करण्यात आली आहे. यामध्ये 347 उमेदवार खुल्या गटातील आहेत. 115 उमेदवार ईडब्ल्यूएस, 303 उमेदवार ओबीसी, 165 एससी, 86 उमेदवार एससी प्रवर्गातील आहेत. 355 उमेदवारांचा निकाल प्रोव्हिजनल ठेवण्यात आला आहे.

परीक्षार्थींच्या गुणांची मार्कशिट 15 दिवसांनंतर जाहीर करण्यात येणार आहे. 9 एप्रिल 2024 पर्यंत यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षेच्या मुलाखती सुरु होत्या. 2 जानेवारीपासून मुलाखत फेरीला सुरुवात झाली होती. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेले साधारण 2846 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. 

यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षा 2023 अंतर्गत आयएएएस, आयपीएस सहित सर्व्हिसेसमध्ये 1143 पदांची भरती निघाली होती. यामध्ये आयएएसच्या 180 जागा, आयपीएसच्या 200 तर आयएफएसच्या 37  रिक्त जागा भरण्यात येत आहेत. 

Related posts