Salary Of Deepak Parekh When Joining Hdfc Bank Offer Letter From 45 Years Ago Is Going Viral

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Deepak Parekh Salary Offer Letter : एचडीएफसी आणि एचडीएफसी बॅंकेचं विलिनीकरण (HDFC-HDFC Bank Merger) 1 जुलैपासून लागू करण्यात आलं. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 30 जून रोजी एचडीएफसीचे दीपक पारेख (Deepak Parekh) यांनी अध्यक्षपदावरून निवृत्ती जाहीर केली होती.  एचडीएफसीचे 19 जुलै 1978 रोजीचं म्हणजे तब्बल 45 वर्षांपूर्वीचं एक पत्र आता सोशल मीडियावर व्हायरल होतंय. हे पत्र म्हणजे दीपक पारेख यांचे ऑफर लेटर होतं. एचडीएफसी जॉईन करताना दीपक पारेख यांना 3,500 रुपये पगाराची ऑफर मिळाली होती. सोबत 500 रुपयांचा फिक्स महागाई भत्तादेखील देण्यात आला होता. तसेच दीपक पारेख यांना 15 टक्के निवासी भत्ता आणि 10 टक्के City Compensatory Allowance देण्यात आला होता. 

एचडीएफसी आणि दीपक पारेख हे गेल्या 45 वर्षांपासूनचे समीकरण. दीपक पारेख यांनी एचडीएफसीच्या विकासात मोठं योगदान दिलं. आता एचडीएफसी आणि एचडीएफसी बॅंकेचं विलिनीकरण (HDFC-HDFC Bank merger) करण्यात आलं आहे. पण त्याच्या आदल्या दिवशीच दीपक पारेख यांनी निवृत्ती जाहीर केली आणि आपला एचडीएफसीसोबतचा प्रवास संपवला. 

दीपक पारेख यांनी 1978 साली एचडीएफसी बँक जॉईन केली होती. त्यावेळी त्यांना देण्यात आलेले ऑफर लेटर आता व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्यांना 3500 रुपये पगार, 500 रुपये महागाई भत्ता, 15 टक्के निवासी भत्ता आणि 10 टक्के City Compensatory Allowance, पीएफ, ग्रॅच्युईटी, मेडिकल बेनिफिट आणि लिव्ह ट्रॅव्हल सुविधा देण्यात आली होती. तसेच त्यांच्या निवासस्थानी असलेल्या फोनचे बिल देण्यासही बँकेने संमती दर्शवली होती. 

 

दीपक पारेख यांच्या नेतृत्वाखाली एचडीएफसी बँकेने नव्वद लाखाहून अधिक भारतीयांना होम लोन दिलं आहे. या माध्यमातून त्यांनी 7.24 लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरित केलं आहे. देशातील एकून होम लोनचा विचार करता एचडीएफसी बँकेचा त्यामध्ये एक तृतियांश वाटा आहे. 

निवृत्तीच्या वेळी दीपक पारेख यांचे भावनिक पत्र

निवृत्तीच्या वेळी दीपक पारेख यांनी भावनिक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात दीपक पारेख म्हणतात की, ‘भविष्यात काय होईल हे येणारा काळच सांगेल. परंतु आज आर्थिक संस्थांना सर्वात मोठी जोखीम आहे ती स्थिती कायम राखणे. यासोबतच भूतकाळात केलेले चांगले काम भविष्यातही कायम राहील, असा विश्वासही कायम ठेवावा लागेल. बदलासाठी धैर्य आवश्यक आहे, कारण तो एखाद्याला कम्फर्ट झोनमधून बाहेर काढतो.

दीपक पारेख म्हणाले की, भविष्यासाठी आशा आणि अपेक्षा ठेऊन निवृत्त होण्याची वेळ आली आहे. एचडीएफसीच्या भागधारकांशी हा माझा शेवटचा संवाद असला तरी आता विकास आणि समृद्धीच्या रोमांचक भविष्याची वाट पाहत आहोत.

ही बातमी वाचा: 

 



[ad_2]

Related posts