Pune News Two Tourists From Mumbai Drowned In Lonavala

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune News : पुण्याच्या लोणावळा (Lonavala) लगतच्या वरसोली गावात वर्षा विहारासाठी आलेल्या मुंबईतील (Mumbai) दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. प्रियांक व्होरा आणि विजय यादव अशी त्यांची नावे होती. त्यांच्या जाण्याने सोबत आलेल्या मित्रांना मोठा धक्का बसला. 

पाय घसरुन तिघे पाण्यात बुडाले, नाका-तोंडात पाणी गेल्याने दोघांचा मृत्यू

प्रियांक, विजय आणि त्यांचे मित्र शनिवारी (8 जुलै) लोणावळा परिसरात सलग सुट्ट्या आल्याने वर्षाविहारासाठी आले होते. लोणावळा शहराजवळ असलेल्या वरसोली गावातील खाणीत पाणी होते. त्यामुळे शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास प्रियांक आणि विजय यादव आणि काही मित्र हे खाणीत असलेल्या पाण्यात उतरले. पाण्यात उतरल्यानंतर काही वेळात पाण्यात पाय घसरल्याने तिघेही पाण्यात बुडू लागले. ते बुडत असल्याचे पाहून बाहेर असलेल्या मित्रांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. रेस्क्यू टीमने काही वेळात त्यांना पाण्याच्या बाहेर काढले. मात्र प्रियांक आणि विजयच्या नाका तोंडात पाणी गेल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय तापसात समोर आले आहे. यात एका युवतीला स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाचवण्यात यश आले आहे. या प्रकरणी लोणावळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कुंडमळा धबधब्यावरील खोल पाण्यात पडून तरुणाचा मृत्यू

दरम्यान तीनच दिवसांपूर्वी मावळ तालुक्यातील कुंडमळा धबधब्यात पाण्यात पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ओंकार गायकवाड असं या तरुणाचं नाव आहे. तो टाटा मोटर्समध्ये नोकरी करत होता. ओंकार गायकवाड आणि त्याच्या तीन-चार मित्रांनी कुंडमळा धबधब्यावर जाण्याचा बेत आखला होता. मात्र हाच फिरण्याचा बेत ओंकार गायकवाडच्या जीवावर बेतला. आपल्या मित्रांसोबत वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी कुंडमळा धबधब्यावर आलेला ओंकार गायकवाड हा वाहत्या पाण्यात उभा होता. परंतु याचवेळी पाय घसरुन तो खोल पाण्यात पडला. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. महत्त्वाचं म्हणजे पाण्यात उभं राहून काही क्षणापूर्वी काढलेला धबधब्यावरील व्हिडीओ अखेरचा ठरला.

हेही वाचा

Lohagad fort: लोहगडावर पर्यटकांची तोबा गर्दी; चार तास लोक महादरवाज्यात अडकले; व्हीडिओ व्हायरल

[ad_2]

Related posts