India Beat Bangladesh By Seven Wickets In 1st Women T20 Harmanpreet Kaur India Women Team

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Harmanpreet Kaur T-20 Record : भारतीय महिला क्रिकेट संघाने (India Women Cricket Team) बांगलादेशविरुद्धचा पहिला टी-20 सामन्यात दमदार विजय मिळवला. टीम इंडियाने (Team India) बांगलादेशचा सात गडी पराभव केला. मीरपूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात यजमान बांगलादेशने (Bangaladesh) भारताला विजयासाठी 115 धावांचं लक्ष्य दिले होतं. टीम इंडियाने लक्ष्याचा पाठलाग करताना 22 चेंडू शिल्लक ठेवून सामन्या शानदार विजय मिळवला. या सामन्यात टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत सिंहने दमदार खेळी केली. हरमनप्रीतने 54 धावांची नाबाद खेळी करत नव्या विक्रमावला गवसणी घातली आहे.

टीम इंडियाचा बांगलादेशवर विजय

बांगलादेश विरुद्धच्या विजयात भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने महत्त्वाची भूमिका बजावली. हरमनप्रीतने अवघ्या 35 चेंडूमध्ये शानदार अर्धशतकी खेळी केली. याशिवाय सलामीवीर स्मृती मानधनानेही 34 चेंडूंत 38 धावांची खेळी केली. यामध्ये पाच चौकारांचा समावेश होता. जेमिमाह रॉड्रिग्ज आणि शेफाली वर्मा यांच्या फलंदाजीने जेमिमाह रॉड्रिग्ज 11 धावा आणि शेफाली वर्मा शून्यावर बाद झाली. बांगलादेशकडून सुलताना खातूनने दोन आणि मारुफा अख्तरने एक विकेट घेतली.

कर्णधार हरमनप्रीतची तुफान कामगिरी

बांगलादेश विरुद्धच्या टी-20 सामन्यात हरमनप्रीत कौरनं मध्ये 35 चेंडूत 54 नाबाद धावा ठोकल्या, यामध्ये 6 चौके 2 षटकार यांचा समावेश आहेत. या दमदार अर्धशतकी खेळीसह हरमनप्रीतनं टी-20 क्रिकेटमधील 11 वं अर्धशतक ठोकलं. यासोबतच तिने चौथ्या क्रमांकावर 10 अर्धशतकं ठोकण्याची विक्रमी कामगिरी केली आहे. 

सूर्यकुमार यादवच्या विक्रमाशी बरोबरी

या विक्रमासोबतच हरमनप्रीतने सूर्यकुमार यादवच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. सूर्यकुमार यादवच्या नावे चौथ्या क्रमांकावर 10 अर्धशतकं ठोकण्याचा विक्रम आहे. चौथ्या क्रमांकावर 10 अर्धशतकं ठोकणारी तिसरी खेळाडू आहे. चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक अर्धशतकं ठोकण्याचा विक्रम इयॉन मॉर्गनच्या नावावर आहे. मॉर्गनने चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक 14 अर्धशतकं ठोकली आहेत.

भारतीय महिला संघाचे व्यस्त वेळापत्रक

बांगलादेश दौऱ्यावर टीम इंडिया तीन टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. भारतीय महिला संघाचे व्यस्त वेळापत्रक बांगलादेश दौऱ्यापासून सुरू झाले आहे. टीम इंडिया पुढील सहा महिन्यांत न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा दौराही करणार आहे. त्याचबरोबर टीम इंडिया इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मल्टी फॉरमॅटमध्ये कसोटी खेळणार आहे. बांगलादेशविरुद्धचे सर्व सहा सामने शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

[ad_2]

Related posts