Teeth Whitening To Remove Yellowness Lemon Salt Toothpaste Home Remedies; दातावर जमलेला पिवळा थर हटविण्यास मदत करेल घरगुती पेस्ट, आठड्यातून ३ वेळा वापर केल्याने मोत्यासारखे चमकतील

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

दातासाठी घरगुती पेस्ट

दातासाठी घरगुती पेस्ट

प्रत्येकाच्या घरात बाजारातील पेस्ट उपलब्ध असते. मात्र तरीही अनेकांना दात पिवळे पडण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. पिवळ्या दातावरील जमलेला थर काढण्यासाठी तुम्ही घरीच पेस्ट तयार करू शकता.

नियमित दातांच्या स्वच्छतेसाठी तुम्ही १ चमचा मीठ घ्या आणि त्यात थोडासा लिंबाचा रस पिळा आणि त्यात मोहरीचे तेल थोडेसे मिक्स करा. ही तयार पेस्ट तुम्ही ब्रशने आपल्या दातावर घासा. या पेस्टमधील अँटीबॅक्टेरियल आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुण हे दाताची स्वच्छता करण्यास मदत करतात.

बेकिंग सोड्याची मदत

बेकिंग सोड्याची मदत

दाताच्या पिवळेपणापासून सुटका मिळविण्यासाठी तुम्हाला बेकिंग सोड्याचाही वापर करता येऊ शकतो. NCBI ने केलेल्या अभ्यासानुसार, बेकिंग सोड्याचा वापर दातावरील पिवळे थर हटविण्यासाठी करता येऊ शकतो.

आपल्या रोजच्या टूथपेस्टमध्ये बेकिंग सोडा मिक्स करा आणि आठवड्यातून २-३ वेळा या पेस्टने ब्रश करा. याचा परिणाम काही दिवसातच दिसू लागतो. दातांचा पिवळेपणा कमी होऊन दात मोत्यासारखे होण्यास मदत मिळते.

(वाचा – ६ तास झोपत नसाल तर व्यायामाचाही होणार नाही उपयोग, वेळीच व्हा सावध)

संत्र्यांनेही होतील दात साफ

संत्र्यांनेही होतील दात साफ

Orchard Scotts Dental ने दिलेल्या अहवालानुसार, संत्र्यांच्या सालीचा दातासाठी चांगला उपयोग होतो. दातांची स्वच्छता करण्यासाठी याचा फायदा करून घेता येतो. एक ताज्या संत्र्यांचे साल रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही दातावर मळा. यामुळे दातावरील प्लाक निघण्यास मदत मिळते. तसंच तोंडातून येणारा दुर्गंधही निघून जातो.

(वाचा – बायकोला चिकटून झोपण्याचे जबरदस्त फायदे, मानसिक आजारांपासून राहता दूर अभ्यासातून सिद्ध)

नारळाचे ऑईल पुलिंग

नारळाचे ऑईल पुलिंग

Coconut Oil Pulling करणेही फायदेशीर ठरते. ऑईल पुलिंग केल्याने दाताच्या कोपऱ्यातील घाण निघण्यासही मदत मिळते. तसंच दातावरील पिवळा थर काढण्यास याचा उपयोग होतो. ऑईल पुलिंग करण्यासाठी तुम्हाला तोंडामध्ये काही वेळ नारळाचे तेल ठेवायचे आहे आणि २ मिनिट्स ठेऊन चूळ भरत ते फेकून द्यायचे आहे.

(वाचा – ६ कारणांमुळे हृदयासाठी गरजेचे आहे विटामिन डी, रक्तदाब ठेवते नियंत्रणात)

संदर्भ

https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC7475120/

https://www.medicalnewstoday.com/articles/323757

https://www.sterlingsmilesazle.com/does-orange-peel-whiten-teeth/

https://www.sciencedirect.com/science/article/pii/S0002817717308115

[ad_2]

Related posts