MS Dhoni Last Match In International Cricket Fans Cried With Him in world cup 2019 video viral; धोनीसोबत संपूर्ण देश रडला होता, कोणाच्याही ध्यानीमनी नव्हतंच की असं घडेल

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या एमएस धोनीसाठी आजचा दिवस कायमच लक्षात असेल. त्याच्या चाहत्यांसाठी मात्र हा दिवस नकोसा होता. कारण, आजच्या दिवशी त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला (MS Dhoni Last Match Date). हा सामना क्रिकेटचा कोणताही चाहता कधीही विसरू शकत नाही, या सामन्याने भारतीय चाहते हळहळले होते. धोनी स्वतःवर रागावला होता, ओरडत होता आणि स्टेडियममध्ये बसलेल्या लोकांसह टीव्ही किंवा मोबाईलवर पाहणाऱ्या प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यात अश्रू होते. त्यादिवशी टीम इंडिया वनडे वर्ल्ड कपमधून बाहेर पडली होती.

भारतीय क्रिकेट संघ २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचल्यामुळे, धोनीच्या नेतृत्वाखाली भारत पुन्हा एकदा विश्वचषक जिंकेल अशी चाहत्यांना आशा होती. हा सामना ९ जुलै रोजी सुरू झाला परंतु राखीव दिवशी म्हणजेच १० जुलै रोजी संपला. २४० धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खूपच खराब झाली. केएल राहुल, रोहित शर्मा आणि विराट कोहली १-१ धावा करून बाद झाले. हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत यांनी ३२-३२ धावांची खेळी करत संघाची धुरा सांभाळली. भारत संकटात होता पण जोपर्यंत एमएस धोनी क्रीजवर होता तोपर्यंत सर्वांना विजयाची अपेक्षा होती. पण त्यावेळी जे घडलं ते प्रत्येकाच्या मनात काम राहील.

धोनीने शानदार फटकेबाजी करायला सुरुवात केली होती. मात्र ४८व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मार्टिन गप्टिलचा थेट थ्रोने धोनीला पॅव्हेलियनमध्ये धाडले. तो थ्रो पाहून पंचही आश्चर्यचकित झाले, गप्टिलने बाऊंड्री लाइनवरून फेकलेला चेंडू थेट विकेटवर जाऊन आदळला. आऊट झाल्यावर ग्राउंडच्या बाहेर जाताना एमएस धोनीचे डोळे ओले झाले होते, तो बहुधा स्वतःवरच रागावला होता.

मैदानातून बाहेर पडताना धोनीचा हा शेवटचा सामना असेल याची चाहत्यांना कल्पनाही नव्हती. भारत विश्वचषकातून बाहेर पडल्याने सर्व चाहत्यांचे मन दु:खी झाले होते. स्टेडियम पूर्णपणे शांत होते, टीव्हीवर पाहणारे चाहतेही भावूक झाले होते. यानंतर धोनीने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. धोनीने शेवटच्या सामन्यात ७२ चेंडूत ५० धावा केल्या होत्या.

धोनीची एक झलक पाहण्यासाठी दिल्लीत गर्दी, व्हिडिओ व्हायरल

विश्वचषकात उपांत्य फेरीतून बाहेर पडल्यानंतर धोनीची कोणत्याही मालिकेत निवड झाली नाही. धोनी निवृत्ती घेईल अशी अटकळ बांधली जात होती पण चाहत्यांना आशा होती की तो फेअरवेल सामना नक्कीच खेळेल. पण सुमारे १ वर्षानंतर २०२० मध्ये १५ ऑगस्ट रोजी धोनीने एका पोस्टद्वारे निवृत्तीची घोषणा केली. धोनीने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आणि आता तो फक्त आयपीएल खेळतो.

[ad_2]

Related posts