Chandrapur Tadoba Tiger Reserve Fraud 12 Crore Fraud From Tadoba Tiger Reserve Ticket Booking Agency

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

चंद्रपूर:  ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला ( Tadoba Tiger Reservation) सफारी बुकिंग करणाऱ्या एजन्सीने सुमारे 12 कोटी 15 लाख रुपयांचा गंडा घातल्याचं उघड झालंय. या प्रकरणी चंद्रपूर (Chandrapur News) वाईल्ड कनेक्टीव्हीटी सोल्युशन या सफारी बुकिंग करणाऱ्या एजन्सी विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत. एजन्सीने पैसे थकविल्याने जिप्सी चालकांच्या जून आणि जुलै महिन्याच्या पेमेंटला उशीर झाला होता आणि तेव्हाच या आर्थिक गैरव्यवहाराची चाहूल लागली होती. या कारवाई ने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

आर्थिक गैरव्यवहाराची चाहूल जुलै महिन्यात

करारनाम्यानुसार तीन वर्षांत एकूण 22 कोटी 80 लाख 67 हजार देय रकमेपैकी केवळ 10 कोटी 65 लाखांचा भरणा या एजन्सीने केला. तर उर्वरित 12 कोटी 15 लाखांसाठी वारंवार पाठपुरावा करूनही उपयोग झालेला नाही. त्यामुळे एजन्सीचे संचालक अभिषेक विनोदकुमार ठाकूर आणि रोहित विनोदकुमार ठाकूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. विभागीय वनाधिकारी सचिन शिंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलाय.  या एजन्सीने पैसे थकविल्याने जिप्सी चालकांच्या जून आणि जुलै महिन्याच्या पेमेंटला उशीर झाला होता आणि तेव्हाच या आर्थिक गैरव्यवहाराची चाहूल लागली होती.चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील जिप्सी चालकांचे 1 जून पासूनचे पेमेंट त्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात 338  जिप्सी असून जिप्सी चालकांची थकीत रक्कम अंदाजे 3 ते 4 कोटींच्या घरात आहे. या कारवाईने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

जिप्सी चालकांच्या जून आणि जुलै महिन्याच्या पेमेंटला उशीर

Mytadoba.org ही ताडोबा ची बुकिंग वेबसाईट गेल्या तीन वर्षांपासून एका खाजगी व्यक्तीला हाताळण्यासाठी देण्यात आली होती आणि या व्यक्तीचा कॉन्ट्रॅक्ट 1 जून पासून समाप्त करण्यात आला आहे. मात्र याच व्यक्तीने बुकिंग मार्फत जमा झालेले पैसे ताडोबा प्रशासनाला दिले नसल्याने हे पेमेंट लेट होत असल्याचा जिप्सी चालकांचा आरोप आहे. तर दुसरीकडे ताडोबा प्रशासन पैसे जमा न झाल्याचं मान्य करतंय मात्र हा उशीर 1 जुलैपासून ताडोबा बंद झाल्यावर वर्षभराचा हिशोब करायचा आहे म्हणून होत असल्याचं ताडोबा प्रशासनाने सांगितलं आहे.

हे ही वाचा :

Sudhir Mungantiwar : सह्याद्रीच्या रांगांमध्ये आता वाघांचं दर्शन होणार; चंद्रपूर जिल्ह्यातील 8 वाघ सह्याद्री परिसरात सोडणार असल्याची वनमंत्री मुनगंटीवारांची माहिती

[ad_2]

Related posts