Good News For Team India Before IND vs WI 1st Test ; पहिल्या कसोटीपूर्वी भारतीय चाहत्यांना गुड न्यूज

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना १२ जुलैला सुरु होणार आहे. पण या सामन्यापूर्वी आता भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. कारण आता मराठमोळा ऋतुराज गायकवाड आणि मुंबईचा यशस्वी जैस्वाल यांना संधी मिळणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

भारताच्या पहिल्या कसोटीत कोणाला संधी मिळणार, याची उत्सुकता सर्वांनाचा आहे. या कसोटी सामन्यापूर्वी एक सराव सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात यशस्वीने तुफानी फटकेबाजी केली होती. यशस्वीने यावेळी धडाकेबाज फटकेबाजीनंतर अर्धशतकही झळकावले होते. त्यामुळे त्याला पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघात स्थान मिळणार, हे संकेत मिळाले होते. पण यशस्वी कोणत्या स्थानावर खेळणार, याबाबत मात्र संदिग्धता आहे. कारम सराव सामन्यात तो रोहित शर्माबरोबर सलामीला आला होता. पण भारतीय संघात शुभमन गिलसारखा युवा सलामीवीरही आहे. त्यामुळे पहिल्या कसोटी यशस्वीला संधी मिळाली तर तो सलामीला येणार की चेतेश्वर पुजाराच्या तिसऱ्या स्थानावर खेळणार, याची उत्सुकता सर्वांना असेल. दुसरीकडे ऋतुराज हा आयपीएलमध्ये भन्नाट फॉर्मात होता. त्यामुळे त्याला आता भारतीय संघातही संधी दिली आहे. त्यामुळे आता पहिल्या कसोटी ऋतुराजला नेमकी कोणाच्या स्थानावर संधी मिळणार, याची जोरदार चर्चा क्रिकेट विश्वात सुरु झाली आहे.

सध्याच्या घडीला ऋतुराज आणि यशस्वी यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ऋतुराज आणि यशस्वी यांनी चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. या व्हिडिओमध्ये ऋतुराज हा यशस्वीला बोलतो की, “आता बीसीसीआय पॉडकास्टवर येणार आहे. या बीसीसीआयच्या पहिल्याच पॉडकास्टसाठी आपण काम करू शकतो. बीसीसीआय नवीन गोष्ट करत आहे आणि या गोष्टीचा पहिलाच एपिसोड करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. त्यामुळे आपण हा पॉडकास्टचा पहिला एपिसोड करूया ना.” यावर यशस्वीने होणार दिला आहे.

धोनीला वाढदिवसानिमित्त आंध्र प्रदेशच्या चाहत्यांचे खास गिफ्ट; उभारला 41 फुटांचा कटआऊट

बीसीसीआयने आता आपल्या चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे. कारण बीसीसीआय पहिल्यांदाच या वेस्ट इंडिजमधील पहिल्या कसोटी पॉडकास्टवर येणार आहे. त्यामुळे या पॉडकास्टचा पहिला एपिसोड कसा होतो, याची उत्सुकता आता चाहत्यांना असणार आहे.

[ad_2]

Related posts