Pune Superstition News 28 Lakhs Was Spent On Superstition On Dhanori Area Pune

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Superstition News : घरात सुख शांती लाभावी, आरोग्य चांगलं राहावं यासाठी एका सॉफ्टवेअर इंजिनियरला जादूटोणा, धार्मिक विधीच्या नावाखाली तब्बल 28  लाख रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरात घडली आहे. त्यामुळे पुरोगामी पुण्यात चाललंय काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

पुण्यातील धानोरी भागात राहणाऱ्या एका 38 वर्षीय व्यक्तीला घरातील अडचणी दूर करण्याच्या बहाण्याने जादूटोणा आणि धार्मिक विधीच्या नावाखाली 28 लाखांचा ऐवज उकळल्याचा प्रकार उघडकीस समोर आला आहे. विशेष म्हणजे फिर्यादी यांच्या पत्नीच्या भावाने हा सगळा प्रकार घडवून आणला आहे. फिर्यादी हे स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर असून गेल्या काही दिवसांपासून त्यांना काही घरगुती समस्या होत्या. या दरम्यान फिर्यादी यांच्या पत्नीच्या भावाने त्यांना “कुलकर्णी काका” या ज्योतिषाची ओळख करून दिली आणि तिथून सुरू हा जादूटोण्याचा खेळ झाला.

आरोपींनी फिर्यादीला घरातील अडचणी दूर करण्यासाठी विश्वासात घेत जादूटोणा आणि धार्मिक विधी करावे लागतील, असे सांगितले. त्यानुसार फिर्यादीने धार्मिक विधीसाठी आरोपींच्या बॅंक खात्यात 20 लाख रुपये जमा केले. तसेच, “कुलकर्णी काका” यांनी फिर्यादीची हस्तरेषा बघितली आणि दोष खूप आहेत,  असे सांगितले. त्यावर उपाय म्हणून गव्हाच्या पिठाचे पुतळे करून त्याला 25 तोळे सोन्याचे दागिने मढवून त्याची विधीवध पूजा करण्यासाठी एका मठात जावे लागेल, अशी बतावणी केली. दागिने आणि रोख रक्कम अशी 28 लाख रुपये घेऊन “कुलकर्णी काका” पसार झाले

या सगळ्या गोष्टी केल्यावर आपली संकटे दूर होतील अशा आविर्भावात फिर्यादी यांनी त्यांचे बँक खाते रिकामे केले. पण ना गुण आला ना फरार झालेले “कुलकर्णी काका परतले”. हताश आणि हतबल झालेल्या फिर्यादी यांनी अखेर विश्रांतवाडी पोलिस ठाणे गाठले. त्यांनी कुलकर्णी काकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलीस तपास करत आहे. 

 पुरोगामी पुण्यात नेमकं चाललंय काय?

मागील काही दिवसांपासून पुण्यात जादुटोण्याच्या घटना समोर येत आहे. कधी पाळीचं रक्त विकल्याच्या तर कधी स्मशानभूमीत क्रिया कर्म करण्याच्या घटना समोर येत आहे. यात आतापर्यंत अनेकांवर कारवाईदेखील करण्यात आली आहे. त्यामुळे उच्चशिक्षण घेतल्यानंतर किंवा पदवी मिळवल्यानंतर शहाणपण येतंच असं नाही. उलट अनेकदा शिक्षित लोकंच अधंश्रद्धेत अडकले जातात. त्यात या प्रकारणामुळे आपल्याला अनेक बाबींवर वैज्ञानिक पद्धतीने बघण्याची गरज पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.

 

[ad_2]

Related posts