IND vs WI: Yashasvi Jaiswal To Make Debut And Play As An Opener In First Test Confirms By Rohit Sharma ; यशस्वी की ऋतुराज… कोणाला मिळणार पदार्पणाची संधी, रोहितने सामन्यापूर्वीच स्पष्ट सांगितलं

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांच्यापैकी एकाला संधी मिळेल, अशी चर्चा होती. पण या दोघांपैकी नेमकी संधी कोणाला मिळेल का प्रश्न सर्वांच्या समोर होता. पण पहिल्या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीच आता भारताचा कर्णधार रोहित शर्माने ही गोष्ट स्पष्ट केली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात नेमकी कोणाला संधी मिळेल, हे रोहितने आता स्पष्ट केले आहे.

रोहितने यावेळी सांगितले की, ” शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर खेळेल, कारण गिलला स्वतः तिसऱ्या क्रमांकावर खेळायचे आहे. त्याने राहुल द्रविड यांच्यासोबत चर्चा केली आहे. गिलने द्रविड यांना सांगितले की, मी माझे सर्व क्रिकेट तीन आणि चार क्रमांकावर खेळले आहे. मला वाटते की, मी माझ्या संघासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली तर मी अधिक चांगले करू शकेन आणि ते आमच्यासाठी देखील चांगले आहे. कारण भारताच्या डावाची सुरुवात ही डाव्या आणि उजव्या फलंदाजांच्या जोडीने होईल,” वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात यशस्वी जैस्वालला पदार्पण करण्याची संधी देण्यात येणार आहे, हे रोहित शर्माने आता स्पष्ट केले आहे. त्यामुळे भारतीय संघात आता रोहित शर्मा आणि यशस्वी हे दोघे सलामीला येतील आणि गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येणार आहे. त्यामुळे आता यशस्वी या सामन्यात कशी फलंदाजी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

धोनीला वाढदिवसानिमित्त आंध्र प्रदेशच्या चाहत्यांचे खास गिफ्ट; उभारला 41 फुटांचा कटआऊट

रोहितने पुढे सांगितले की, ” गिलेने हे स्वत: स्पष्ट केले आहे म्हणून मला वाटते की आम्ही तीच गोष्ट करण्याचा प्रयत्न करू. मला आशा आहे की, ही गोष्ट दीर्घकाळ चालेल. कारण आम्ही अनेक वर्षांपासून डाव्या हाताच्या फलंदाजाच्या शोधात आहोत. त्यामुळे आता आम्हाला तो डावखुरा मिळाला आहे, आशा करूया की तो सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करेल. त्यामुळे यशस्वी हा संघासाठी एक चांगला सलामीवीर म्हणून पुढे येऊ शकतो. त्याच्याकडे अजून बराच वेळही आहे आणि डावखुरा असल्याचा त्याला फायदाही मिळेल.”

[ad_2]

Related posts