Chandrayaan 3 Will Launch Today How Much Is Lunar Mission Cost Find Out Chandrayaan 1 Chandrayaan 2 Chandrayaan 3 Isro Moon Mission Budget

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ISRO Chandrayaan-3 : भारत तिसऱ्या चंद्र मोहिमेसाठी सज्ज आहे. आज चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चं प्रक्षेपण 14 जुलै रोजी 2.35 वाजता करण्यात येणार आहे. आज भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) म्हणजेच इस्रोसाठी (ISRO) महत्त्वाचा दिवस आहे. चार वर्षानंतर इस्रो पुन्हा एकदा महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेसाठी सज्ज झाला आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून लाँच व्हेईकल मार्क-3 (LVM-3) रॉकेटद्वारे चांद्रयान-3 प्रक्षेपित केला जाणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा भारताचा हा दुसरा प्रयत्न असेल. ही चांद्रयान-3 मोहिम यशस्वी झाल्यास चंद्रावर पाऊल ठेवणार भारत चौथा देश ठरेल. 

आज चांद्रयान-3 अवकाश भरारी घेणार

चांद्रयान-3 मोहिमेद्वारे भारताचा दुसऱ्यांदा चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न आहे. याआधीच्या दुसऱ्या मोहिमेत चांद्रयान-2 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यात अयशस्वी ठरलं होतं. चांद्रयान-3 साठी तसेच इस्रोच्या या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेसाठी एकूण किती खर्च आला आहे, हे जाणून घ्या.

भारताची चंद्र मोहीम चांद्रयान 3 

इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी यापूर्वी सांगितलं आहे की, चांद्रयान-3 अंतराळयान 14 जुलै रोजी दुपारी 2.35 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात येईल. चांद्रयान-3 अंतराळयान 23 किंवा 24 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची शक्यता आहे.

ISRO Moon Mission Budget : इस्रोच्या चंद्र मोहिमेचा एकूण किती खर्च

Chandrayaan-3 Budget : चांद्रयान 3 बजेट

चांद्रयान-3 मोहिमेसाठी चांद्रयान-2 च्या तुलनेनं कम खर्च आला आहे. कारण, चांद्रयान-3 मधून फक्त लँडर आणि रोव्हर हे अवकाशात पाठवलं जाणार आहे. याआधी प्रक्षेपित करण्यात आलेल्या चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरचा वापर चांद्रयान-3 मोहिमेत करण्यात येणार असल्याने चांद्रयान-3 मध्ये ऑर्बिटर पाठवण्यात येणार नाही. चांद्रयान-2 मोहिमेसाठी 960 कोटी रुपये खर्च आला होता. तर चांद्रयान-3 मोहिमेसाठी 615 कोटी रुपये खर्च आला आहे. चांद्रयान-3 प्रक्षेपणाचा खर्च सुमारे 75 कोटी आहे.

Chandrayaan-2 Budget : चांद्रयान 2 बजेट

इस्रोने 22 जुलै 2019 रोजी त्यांची दुसऱ्या चंद्र मोहिमेत चांद्रयान-2 लाँच केलं होतं. भारताच्या दुसऱ्या चंद्र मोहिमेचा एकूण खर्च सुमारे 124 दशलक्ष डॉलर म्हणजेच सुमारे 850 कोटी रुपये होता. यामध्ये प्रक्षेपणासाठी 123 कोटी रुपये आणि उपग्रहासाठी 637 कोटी रुपये या खर्चाचा समावेश आहे. ही जगातील सर्वात स्वस्त चंद्र मोहिमांपैकी एक असल्याचे सांगण्यात आले. दुसर्‍या चंद्र मोहिमेची किंमत हॉलीवूडच्या ब्लॉकबस्टर अ‍ॅव्हेंजर्स एंडगेमच्या बजेटपेक्षा निम्म्याहून कमी होती. अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम चित्रपटाचं अंदाजे बजेट 356 दशलक्ष डॉलर आहे. दरम्यान, चांद्रयान-2 मोहिम अयशस्वी ठरली होती. चंद्रावर लँडिंगपूर्वी 400 मीटर अंतरावर इस्रोचा लँडरशी संपर्क तुटल्याने चांद्रयान 2 मोहिम अयशस्वी ठरली.

Chandrayaan-1 Budget : चांद्रयान-1 बजेट

चांद्रयान-1 चंद्र मोहिमेचा खर्च 386 कोटी रुपये होता. चांद्रयान-1 हे 22 ऑक्टोबर 2008 रोजी लाँच करण्यात आलं होतं. ही मोहिम यशस्वी ठरली होती. चंद्राच्या रासायनिक, खनिज आणि फोटो-जिओलॉजिकल मॅपिंगसाठी हे यान चंद्राच्या पृष्ठभागापासून 100 किमी उंचीवर चंद्राभोवती फिरत होतं. ही माहितीचा पुढील चंद्र मोहिमेसाठी उपयुक्त ठरली.

बॉलिवूड चित्रपटांचं बजेट

दरम्यान, भारताचीही चंद्र मोहिम इतर देशांच्या तुलनेने फार कमी आहे. ही जगातील सर्वात स्वस्त चंद्र मोहिम आहे. चांद्रयान-3 च्या तुलनेनं अभिनेता प्रभासच्या आदिपुरुष ‘आदिपुरुष’ हा चित्रपट 500 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला होता, जो चांद्रयान 3 पेक्षा केवळ 115 कोटी रुपये कमी आहे. तर, आलिया भट्ट, रणबीर कपूरचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट 450 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला होता, जो चांद्रयान 3 च्या बजेटपेक्षा 165 कोटी रुपये आहे. 

चांद्रयान-3 मोहिम कशी आहे?

चांद्रयान-3 हे चांद्रयान-2 चे फॉलो-ऑन मिशन आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग आणि फिरून महत्त्वाचे नमुने आणि माहिती गोळा करेल. चांद्रयान-3 मध्ये लँडर आणि रोव्हर पाठवण्यात येणार आहे. हे LVM3 रॉकेटद्वारे चांद्रयान-3 लाँच केलं जाईल. प्रोपल्शन मॉड्यूल 100 किमी चंद्राच्या कक्षेपर्यंत लँडर आणि रोव्हर कॉन्फिगरेशन घेऊन जाईल. त्यानंतर लँडरच्या मदतीने चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करेल. चांद्रयान 3 च्या लँडरचं नाव विक्रम (Vikram) आणि रोव्हरचं नाव प्रज्ञान (Pragyan) आहे.

संबंधित इतर बातम्या :

[ad_2]

Related posts