Virat Kohli Became Fifth Highest Run Scorers For India In Test Ind Vs Wi Dominica Test Latest Sports News Update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Virat Kohli Test Records : डोमिनिका टेस्टमध्ये (Dominica Test) भारताचं वर्चस्व कायम आहे. कसोटीच्या दुसऱ्या (India vs West Indies) दिवसानंतर भारत (Team India) दोन विकेट गमावून 312 धावांवर आहे. या दमदार खेळीमुळे भारत विंडीजच्या (West Indies) 162 धावांनी पुढे आहे. यशस्वी जैस्वालनं () पहिलं आंतरराष्ट्रीत शतक ठोकलं आहे, तर विराट कोहलीनंही शानदार खेळी केली आहे. डोमिनिका कसोटीच्या दुसऱ्या दिवसा अखेर यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहली नाबाद आहेत. यशस्वी जैस्वाल 350 चेंडूत 143 धावा केल्या आहेत. तर, विराट कोहली (Virat Kohli) ने 96 चेंडूत 36 धावा करून नाबाद आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये 72 धावांची भागीदारी झाली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या डोमिनिका कसोटीच्या दुसऱ्या दिवशी विराट कोहलीने एक मोठा विक्रम केला.

कसोटीत सर्वाधिक धावा करणारा पाचवा खेळाडू

विराट कोहली भारताकडून कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा पाचवा खेळाडू ठरला आहे. विराट कोहलीने आपल्या कसोटी कारकिर्दीत 8504 धावा केल्या आहेत. भारताकडून कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकरच्या नावावर 15921 धावा आहेत. तो कसोटी इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. तर राहुल द्रविड भारतासाठी कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकावर आहे. राहुल द्रविडने आपल्या कसोटी कारकिर्दीत 13265 धावा केल्या.

विरेंद्र सेहवागला टाकलं मागे

माजी कर्णधार विराट कोहलीने 8500 धावांचा पल्ला पार केला आहे. कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजामध्ये विराट कोहली पाचव्या स्थानावर पोहचला आहे. विराट कोहलीने 110 व्या सामन्यात 8500 धावांचा पल्ला पार केला आहे. या कामगिरीत विराट कोहलीने विरेंद्र सेहवागला मागे टाकलं आहे. विराट कोहलीच्या पुढे आता लक्ष्मण, गावस्कर, द्रविड आणि सचिन तेंडुलकर हे फलंदाज आहेत. 

यादीत कोणत्या खेळाडूंचा समावेश?

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. व्हीव्हीएस लक्ष्मणने भारताकडून कसोटी सामन्यात 8781 धावा केल्या आहेत. या यादीत व्हीव्हीएस लक्ष्मण चौथ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर सुनील गावसकर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. सुनील गावस्कर यांनी कसोटी कारकिर्दीत 10122 धावा केल्या. तर विराट कोहली 8504 धावांसह भारतासाठी कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारा पाचवा खेळाडू ठरला आहे.

संबंधित इतर बातम्या :

[ad_2]

Related posts