DC Vs CSK Pitch Report Of Arun Jaitley Stadium For IPL 2023 Match In Delhi 2023 Ipl Marathi News Updates

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

CSK vs DC Match Prediction : इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या 67 व्या सामन्यात आज चेन्नई आणि दिल्ली (DC vs CSK) संघ आमने-सामने येणार आहेत. दिल्लीच्या घरच्या मैदानावर, अरुण जेटली स्टेडिअमवर (Arun Jaitley Stadium) 20 मे रोजी दुपारी 3.30 वाजता हा सामना रंगणार आहे. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी चेन्नई संघाला आजचा सामना जिंकणं आवश्यक आहे. चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघ मागील सामन्यात कोलकाताकडून पराभवानंतर आज मैदानात उतरेल. तर दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेला असला, तरी गेल्या काही सामन्यांमधील दिल्लीचा फॉर्म पाहता आजचा सामना जिकणं चेन्नईसाठी आव्हान असणार आहे. 

चेन्नई प्लेऑफमध्ये पोहोचणार की दिल्ली मार्ग खडतर करणार?

आयपीएल 2023 च्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या दिल्ली संघांच्या आशेवर पाणी फिरलं आहे. मात्र, चेन्नई संघासाठी ही अखेरची संधी असेल. त्यामुळे चेन्नई (Chennai Super Kings) संघाला आजचा सामना जिंकणं फार महत्त्वाचं आहे. तर, दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघ चेन्नई सुपर किंग्सचा प्रवास खडतर करण्याची शक्यता आहे. चेन्नई संघ सध्या गुणतालिकेत 15 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर दिल्ली संघ 10 गुणांसह नवव्या स्थानावर आहे. यंदाच्या आयपीएलमधील साखळी सामन्यांतील चेन्नई आणि दिल्ली संघाचा हा शेवटचा सामना असेल.

चेन्नई संघासमोर दिल्लीचं आव्हान

चेन्नई संघाकडे सध्या 15 गुण आहेत. चेन्नई सुपर किंग्स संघाने आतापर्यंतच्या 13 सामन्यांपैकी सात सामने जिंकले तर पाच सामने गमावले आहेत. या उलट दिल्ली कॅपिटल्स संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी असून संघाकडे आठ गुण आहेत. दिल्ली संघाला यंदाच्या हंगामातील 13 पैकी फक्त पाच सामने जिंकता आले असून आठ सामन्यांमध्ये संघाला पराभव पत्करावा लागला आहे.

CSK vs DC Head to Head : हेड टू हेड आकडेवारी

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघ एकूण 28 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये चेन्नई संघाचं पारड जड आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाने 18 सामन्यांमध्ये दिल्लीचा पराभव केला आहे. दिल्ली संघाला मात्र चेन्नई विरुद्धचे फक्त 10 सामने जिंकता आले आहेत.

IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?

चेन्नई सुपर किंग्स (CSK)  आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात आज 20 मे रोजी सामना रंगणार आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडिअमवर (Arun Jaitley Stadium) दुपारी 3.30 वाजता रंगणार आहे. दुपारी 3 वाजता नाणेफेक होईल.

IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?

आयपीएल 2023 (IPL 2023) च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) ‘जिओ सिनेमा’ ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

IPL 2023 Play Offs Scenario : चेन्नई, लखनौ आणि बंगळुरु संघाला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी, मुंबई संघाची वाट बिकट

[ad_2]

Related posts