RBI Withdrawn 2000 Note: २० हजारांपेक्षा जास्त कॅश हवी असेल तर? बंधने काय काय? ३० सप्टेंबरनंतर नोटांचं काय होणार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : आरबीआय अर्थात रिझर्व बँक ऑफ इंडियाने आज अचानक २००० रुपयांच्या नोटा परत घेण्याचा निर्णय जाहीर करुन सगळ्यांना धक्का दिला. २०१६ साली २००० हजारांच्या नोटा चलनात आल्या होत्या. ७ वर्ष या नोटा चलनात राहिल्यानंतर ३० सप्टेंबरपासून या नोटा बंद करत आहोत, अशी घोषणा आरबीआयने केली आहे. इतर मूल्यांच्या नोटा बाजारात पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत, त्यामुळे २ हजारांच्या नोटा बंद करत आहोत, असं कारण देऊन आरबीआयने हा निर्णय घेतला. असं असलं तरी ३० सप्टेंबरनंतरही २ हजार रुपयांच्या नोटा कायदेशीर राहतील म्हणजेच वैध असणार आहे. या निर्णयाने सर्वसामान्यांच्या मनात खूप सारे प्रश्न आहेत. तुमच्या त्याच प्रश्नांची उत्तरे आम्ही देत आहोत…१) २ हजारांच्या नोटा कधीपर्यंत नोटा जमा करता येणार?

-आरबीआयच्या पत्रकानुसार २३ मे २०२३ ते ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत २ हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करता येणार आहेत.

२) २ हजारांच्या नोटा जमा करताना नोटांची काही मर्यादा असणार का?

-होय, २ हजार रुपयांच्या नोटा जमा करताना एका वेळी फक्त २० हजार रुपयांपर्यंत रक्कम जमा करता येणार आहे. म्हणजे एका वेळी केवळ १० नोटाच बदलता येणार आहे.

३) बँकेत खाते नसलेल्यांनी या नोटा कुठे जमा कराव्या?

-बँकेत नोटा जमा करताना कोणत्याही बँकेत खातं असावं, अशी कोणतीच पूर्वअट नाहीये. तुम्ही देशातील कोणत्याही बँकेत, कोणत्याही शाखेत तुम्ही नोटा बदलून घेऊ शकता-जमा करु शकता. असं असलं तरी बँकेत खाते नसलेले ग्राहक देखील एकावेळी २० हजारांपर्यंतच नोटा बदलून घेऊ शकतात.

४) २ हजारांच्या नोटा बदलून देण्यासाठी काही फी आकारली जाणार आहे का?

-नाही, २ हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्यासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही.

५) ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना या नोटा बदलून घेण्यासाठी बँकेत काही सुविधा असणार आहे का?

-होय, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना चांगली सुविधा देण्याच्या सूचना आरबीआयने बँकांना दिल्या आहेत

६) ३० सप्टेंबरनंतरही २ हजार रुपयांच्या नोटा कायदेशीर असतील, वैध असतील?

-होय ३० सप्टेंबरनंतरही २ हजार रुपयांच्या नोटा कायदेशीर राहतील म्हणजेच वैध असणार आहे. आरबीआयला अपेक्षा आहे की लोकांना बँकांमध्ये नोटा बदलून घेण्यासाठी ४ महिन्यांचा कालावधी पुरेसा आहे. चलनात असलेल्या २ हजार रुपयांच्या बहुतांश नोटा ३० सप्टेंबरच्या दिलेल्या मुदतीत बँकांमध्ये परत येतील. लोकांना घाबरण्याची गरज नाही.

७) जर एखाद्या व्यक्तीने २ हजारांची नोट जमा केली नाही किंवा बदलून घेतली नाही तर काय होईल?

– ही प्रकिया लोकांसाठी सुरळित आणि सोयीस्कर बनविण्यासाठी २ हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी ४ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी देण्यात आलेला आहे. त्यामुळे जनतेला दिलेल्या वेळेत त्यांच्या सोयीनुसार या सुविधेचा लाभ घेता येईल.

८) एखाद्या बँकेने जर २ हजारांची नोट स्वीकारण्यास किंवा बदलून देण्यास नकार दिला, तर काय करता येईल?

-ग्राहक आपल्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी रिझर्व बँक एकात्मिक लोकपाल योजना अंतर्गत तक्रार नोंदवू शकतात.

९) जर कुणाला २० हजारांपेक्षा जास्त कॅश बँकेतून हवी असल्यास मिळेल का?

-तुम्ही २ हजारांच्या कितीही नोटा बँकेत जमा करु शकता. पण रोख स्वरुपात एकाच वेळी मात्र तुम्हाला २० हजार रुपयेच काढता येणार आहेत.

[ad_2]

Related posts